जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / जेव्हा घरात पाल येते... सिद्धार्थ-मिताली सेलेब्रिटी कपलच्या घरातला VIDEO आला बाहेर

जेव्हा घरात पाल येते... सिद्धार्थ-मिताली सेलेब्रिटी कपलच्या घरातला VIDEO आला बाहेर

जेव्हा घरात पाल येते... सिद्धार्थ-मिताली सेलेब्रिटी कपलच्या घरातला VIDEO आला बाहेर

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली अनेकदा त्यांच्या घराजवळ आलेल्या प्राण्यांचे फोटो शेअर करत असतात मात्र आता त्यांच्या घरात असा एक प्राणी शिरला आहे ज्याला बाहेर काढणं मुश्किल झालं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑक्टोबर : अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आज देखील सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसत आहे की मिताली आणि सिद्धार्थ चांदेकरच्या घऱात एका प्राण्याने प्रवेश केले आहे. आणि मिताली हातात झाडू घेऊन त्याला घरातून बाहेर काढायचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थ चांदेकरने मितालीचा हा अवतार पाहून माझी हुशार मुलगी…अशी कॅप्शन दिली आहे. सध्या  सेलेब्रिटी कपलच्या घरातला हा मजेदार व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली अनेकदा त्यांच्या घराजवळ आलेल्या प्राण्यांचे फोटो शेअर करत असतात मात्र आता त्यांच्या घरात असा एक प्राणी शिरला आहे ज्याला बाहेर काढणं मुश्किल झालं आहे. सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. यासोबतच चाहत्यांकडून या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे माझी हुशार ..मुलगी .. तो हे सगळं मिताली उद्देशून म्हणत आहे. तो असं का म्हणत आहे हे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येते.या दोघांच्या घरात संबंध महिला वर्गाला न आवडणारा सरपटणारा प्राणी म्हणजे पालीने प्रवेश केला आहे. तिला हकलण्यासाठी मिताली प्रयत्न करत आहे. यासाठी तिने हाता झाडू घेत तिला बाहेर काढत आहे. मध्येच तिला सिद्धार्थ भिती देखील घालाताना दिसत आहे. मिताली मात्र पालीला भित सर्व घरातील खुर्ची, टेबलवरून फिरताना दिसत आहे. वाचा : Dream Girl @73 : हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत असा केला वाढदिवस साजरा, पाहा Photos संबंध मुली वर्गाची पालीला पाहून जी अवस्था होते तीचा मितालीच झाली. प्रत्येक घरात हे चित्र पाहण्यास मिळत… असाच काही तरी पर्याय शोधून पालीला बाहेर काढलं जातं. मितालीने देखील हातात झाडू घेऊन पालीला बाहेर काढत आहे मात्र माल काय हलायचं नाव घेत नाही असंच दिसत आहे. मात्र हा गंमतीदार व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.या व्हिडिओवर काही गंमतीदार कमेंट देखील आल्या आहेत. एकीने म्हटले आहे की, प्रत्येक घरात एक अशी शुर स्त्री असतेच, दुसरीने म्हटले आहे की, मी फक्त खुर्चीवर जाऊन उभी राहते.. कोणीतरी बाहेर काढा ..तर एकींने म्हटले आहे, मला देखील पालीची भिती वाटते..अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर आल्या आहेत.

जाहिरात

यापूर्वी देखील सिद्धार्थ चांदेकरने असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओत दोघेही एका गोष्टीवरून वाद घालताना दिसत होते. सिद्धार्थ चांदेकर या व्हिडिओच्या सुरूवातीला म्हणत होता की, सो गायज आता आपण पाहणार आहे की…. एवढ्यात त्याच्या तोंडावर त्याची बायको म्हणजे मिताली जोरात टॉवेल फेकते आणि आतून बाहेर येते ओ म्हणते की…मी काय सांगितले आहे तुला गादीवर ओला टॉवेल टाकू नको. यावर सिद्धार्थ म्हणतो थोडावेळासाठी टाकला होता……यावर मिताली म्हणते की….गादी ओली झाली आहे. त्यावर तो लगेच म्हणतो की,मी व्हिडिओ बनवत आहे ..तर मिथाली देखील म्हणते ..व्हिडिओ बनवतो मान्य आहे..पण अंघोळ केल्यानंतर टॉवेल हुकवर लावता येत नाही का..यावर सिद्धार्थ म्हणतो की, काय फालतूगिरी लावली आहे..तर मिताली देखील म्हणते म्हणजे मी फालतूगिरी लावली आहे..आणि जोराने shut up असे म्हणते..त्यावेळी सिद्धार्थ मध्येच तिचा मूड बदलण्यासाठी गाण म्हणत डान्स करतो मात्र त्याचा काय परिणाम होत नाही आणि तो निघून जातो.खर तर सिद्धार्थने शेअर केलेला हा व्हिडिओ प्रत्येक घराशी व जोडप्याशी रिलेट करणारा असाच होता. बऱ्याचवेळा अशा लहान गोष्टींवर खटके उडत असतात पण त्यात एक गंमत असते. त्यामुळे शेवटी काय कहानी घर घर की..प्रत्येक घरात दररोज असा एक तरी सीन होतच असतो. सध्या देखील त्यांचा हा नवीन व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. वाचा : ‘कारट्यांनो किती धुडगूस घालता रे…’ Bigg Boss Marathi च्या घरात खास व्यक्तीची एन्ट्री  सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी 24 जानेवारी 2021ला लग्नगाठ बांधली व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते. यानंतर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी 24 जानेवारी 2021ला लग्नगाठ बांधली. मिताली आणि सिद्धार्थ या जोडीचे लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमाचे व लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच त्यांच्या लग्नातील लूकची देखील सोशल मीडियावर रंगली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात