मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ही चित्रपट निर्माती भागवते तान्ह्या जीवांची भूक; आतापर्यंत दान केलंय 100 लिटर ब्रेस्ट मिल्क

ही चित्रपट निर्माती भागवते तान्ह्या जीवांची भूक; आतापर्यंत दान केलंय 100 लिटर ब्रेस्ट मिल्क

निधी परमार यांची ओळख बॉलिवूडमधील एक उत्तम निर्मात्या म्हणून आहे. 'सांड की आँख' सारख्या (Saand ki Aankh) वेगळ्या चित्रपटाची निर्मिती करून एक वेगळा विषय लोकांसमोर आणण्याचे धाडस त्यांनी दाखवलं

निधी परमार यांची ओळख बॉलिवूडमधील एक उत्तम निर्मात्या म्हणून आहे. 'सांड की आँख' सारख्या (Saand ki Aankh) वेगळ्या चित्रपटाची निर्मिती करून एक वेगळा विषय लोकांसमोर आणण्याचे धाडस त्यांनी दाखवलं

निधी परमार यांची ओळख बॉलिवूडमधील एक उत्तम निर्मात्या म्हणून आहे. 'सांड की आँख' सारख्या (Saand ki Aankh) वेगळ्या चित्रपटाची निर्मिती करून एक वेगळा विषय लोकांसमोर आणण्याचे धाडस त्यांनी दाखवलं

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर : आपल्या भारतीय समाजात मुलीचं लग्न (Marriage) आणि मातृत्व (Motherhood) याला आजही अतिशय महत्त्व दिलं जातं. लग्न झालं की लगेचच मूल कधी जन्माला घालणार याबाबत समाजातील लोकांकडून विचारणा सुरू होते. अर्थात पूर्वीच्या काळापेक्षा आता याबाबतीत खूप फरक पडला आहे, पण ही मानसिकता बदलेली नाही. स्त्री कितीही मोठ्या पदावर असो किंवा तिनं कितीही नाव कमावलेलं असो लग्न, मूल होणं या प्रश्नांपासून तिची सुटका होत नाही. बॉलिवूडमधील (Bollywood) एका स्त्री निर्मातीला (Producer) देखील समाजाच्या या प्रश्नांना सामोरं जावं लागलं आहे.

कामाच्या आघडीवर आणि वैयक्तिक पातळीवर स्त्री म्हणून येणाऱ्या सामाजिक दडपणाचा सामना करत तिनं निर्माती म्हणून आपली कारकीर्द यशस्वी केलीच आहे; पण त्याचबरोबर मानवी दूध दान (Breast Milk Donation) करून अनेक तान्ह्या जीवांची आईच्या दुधाची भूक तिने भागवली आहे. तिच्या या संघर्षाबाबत कोणाला फार माहिती नाही. ही आगळीवेगळी कहाणी आहे निर्मात्या निधी परमार (Nidhi Parmar) यांची. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

सलमान खानने मुंबईत घेतलं डुप्लेक्स घर, महिन्याचं भाडं ऐकून हैराणच व्हाल

निधी परमार यांची ओळख बॉलिवूडमधील एक उत्तम निर्मात्या म्हणून आहे. 'सांड की आँख' सारख्या (Saand ki Aankh) वेगळ्या चित्रपटाची निर्मिती करून एक वेगळा विषय लोकांसमोर आणण्याचे धाडस निधी परमार यांनी दाखवलं आणि आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्याचवेळी स्त्री म्हणून त्यांना समाजाच्या पारंपरिक मानसिकतेला सामोरं जावं लागलंच. निधी परमार यांनी मुंबईत पाऊल ठेवलं तेच चित्रपट निर्माती होण्याच्या महत्वाकांक्षेनं. त्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संघर्ष केला. सुरुवातीला जाहिरात आणि टॅलेंट एजंट म्हणून काम केले. अशीच काही वर्षे गेली आणि त्यादरम्यान त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार मिळाला. त्यांनी लग्न केलं आणि वैयक्तिक आयुष्यात त्यांना प्रत्येक स्त्रीला कराव्या लागणाऱ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं.

लग्न झाल्यानंतर त्यांचे पालक, आप्त आणि समाजातील लोकही मूल कधी जन्माला घालणार याविषयी विचारणा करू लागले. सर्वांकडून व्यक्त होणारी ही अपेक्षा त्यांच्यावर दडपण आणू लागली होती. एक स्त्री म्हणून हे करणं खूप महत्वाचं आहे, ही मागणी ओझं बनू लागली होती. पण स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस (Production House) सुरू करणं याला त्यांचं प्रथम प्राधान्य होतं.

सलमान खानच्या 'Antim'ची प्रदर्शनापूर्वीच धूम ; सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये

काही काळ असाच गेला. नंतर त्यांच्या कुटुंबानेही त्यांना त्यांच्या कामासाठी पाठिंबा देण्यास सुरुवात केली.अखेर निधी यांनी आपलं पहिलं स्वप्न पूर्ण केलं. स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आणि' सांड की आँख ' या चित्रपटाची निर्मितीही केली. त्यानंतर त्यांनी आई होण्याचा (Mother) निर्णय घेतला. वयाच्या 40 व्या वर्षी त्या आई झाल्या. त्यामुळे अनेकदा मुलापेक्षा करिअरला त्यांचे अधिक प्राधान्य असण्याबद्दल विचारलं जातं. त्यावर त्या उत्तर देतात, मी स्वतः निवडलं आहे. म्हणून मी दोन्ही गोष्टी निवडल्या आहेत. 'स्वतःच्या इच्छेनुसार दोन्ही गोष्टी साध्य केल्याचा आपल्याला अतिशय आनंद असल्याचं त्या सांगतात.

एवढं करून त्या थांबल्या नाहीत. आई झाल्यावर त्यांनी आणखी एक अनोखं काम करून स्त्री म्हणून आपल्या सर्जनशीलतेचा, ममतेचा नवा पैलू दर्शवला. निधी यांनी स्तनपान आणि मानवी दूध दान देण्याविषयीची रूढी मोडण्याचा प्रयत्न करत, लॉकडाउन (Lockdown) दरम्यान लवकर जन्मलेल्या बाळांसाठी (Premature Babies) 100 लिटर मानवी दूध दान (Donated 100 Litre Breast Milk) केलं. त्यांची ही वेगळी बाजू समाजाला माहीत नाही. एखादी स्त्री ठरवलं की काहीही करू शकते. आपलं करिअर आणि वैयक्तिक आयुष्य दोन्ही आघाड्यांवर ती यशस्वी होऊ शकते याचे निधी परमार या उत्तम उदाहरण आहेत.

First published:

Tags: Milk combinations, Producer, Small baby