Actor Akshat Death Case: 'लग्नास नकार दिल्याने फ्लॅटमेटने केली हत्या', अभिनेत्याच्या वडिलांचा गंभीर आरोप

Actor Akshat Death Case: 'लग्नास नकार दिल्याने फ्लॅटमेटने केली हत्या', अभिनेत्याच्या वडिलांचा गंभीर आरोप

भोजपुरी सिनेमातील नवोदित कलाकार अक्षत उत्कर्षचा (Akshat Utkarsh) मुंबईत मृत्यू झाल्याचे प्रकरण आता आणखी एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. अभिनेत्याच्या वडिलांनी त्याच्या फ्लॅटमेटवर गंभीर आरोप केले आहेत.

  • Share this:

सुधीर कुमार, मुजफ्फरपूर, 02 ऑक्टोबर : भोजपुरी सिनेमातील नवोदित कलाकार अक्षत उत्कर्षचा (Akshat Utkarsh) मुंबईत मृत्यू झाल्याचे प्रकरण आता आणखी एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचले आहे. अक्षतच्या वडिलांनी त्याची फ्लॅट पार्टनर  असणारी स्नेहा चौहान (Sneha Chauhan) हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मुझफ्फरपूर नगर पोलिस ठाण्यात अर्ज केला आहे. पोलिसांनी त्यांचा अर्ज स्विकार केला आहे. शहर डिसीपी राम नरेश पासवान यांनी त्यांच्या अर्जावर योग्य कायदेशीर कारवाई होईल असे आश्वासन देखील दिले आहे. सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाप्रमाणेच अक्षतच्या मृत्यूचे गुढ वाढत चालले आहे.

याप्रकरणात मुंबई पोलिसांनी ही आत्महत्येची केस असल्याचे म्हटले होते. मात्र अभिनेत्याचे वडील राजू चौधरी यांनी अक्षतबरोबर अंधेरी याठिकाणी राहणाऱ्या त्याची फ्लॅटमेट स्नेहा चौहानवर हत्येचा आरोप केला आहे. त्यांनी याप्रकरणी केलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, स्नेहा तिच्या  बहिणीच्या मदतीने अक्षतवर लग्नासाठी दबाव आणत होती. अक्षतने या गोष्टीस विरोध केला होता, आईवडिलांच्या परवानगीनेच तो लग्न करणार होता असे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे. मात्र त्याचा नकार सहन न झाल्याने स्नेहाने त्याचा खून करवला, असा आरोप अक्षतच्या वडिलांनी केला आहे.

(हे वाचा-'पायल घोषचे आरोप खोटे', त्यावेळी अनुराग श्रीलंकेत होता असल्याचा वकिलाचा दावा)

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी असे म्हटले आहे की, 27 सप्टेंबर रोजी रात्री अक्षतने साधारण 9 च्या सुमारास कॉल केला. तो व्यवस्थित बोलला पण घाबरलेला वाटत होता, त्याने अचानक फोन कट केला. त्यानंतर अक्षतने फोन उचलला नाही. त्यानंतर स्नेहाच्या भावाने अक्षतच्या घरच्यांना फोन करून सांगितले की त्याने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी कट करून त्याची हत्या केल्याचा आरोप अक्षतच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणात मुंबई पोलिसांवर निष्काळजीपणावर देखील आरोप केला जात आहे. अशी माहिती मिळाली आहे की, अक्षत उत्कर्ष अंधेरी वेस्टमधील त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये सापडला. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या आहे.

(हे वाचा-या महिला खासदार दिसणार SOS Kolkata मध्ये, सिनेमाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती)

अक्षतचे मामा रंजित सिंह यांनी अशी माहिती दिली होती की, अक्षतच्या मृत्यूनंतर त्यांना अंधेरी वेस्ट पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले आणि मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले. अक्षतच्या मृत्यूची एफआयआर कॉपी दिली नाही आणि ज्या मृतदेहाबरोबर जे चालान दिले गेले होते तेदेखील मराठी भाषेत लिहिलेले आहे, जे कोणालाही समजू शकत नाही. अक्षतचे काका विक्रांत किशोर यांनी सांगितले की जेव्हा ते फ्लॅटमध्ये पोहोचले तेव्हा स्नेहा चौहान तेथे हजर होती.

अक्षत भोजपुरी सिनेमात त्याचे नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात होता. लखनऊमधून त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले होते. गेल्या 2 वर्षांपासून तो मुंबईत राहत होता आणि अंधेरी वेस्टमधील आरटीओ ऑनलाइन सुरेश नगर स्थित एका भाड्याच्या घरात तो राहत होता. याठिकाणी त्याच्याबरोबर स्ट्रगलर अभिनेत्री स्नेहा चौहान राहत असे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 2, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या