#metoo Case: ऑगस्ट 2013मध्ये अनुराग श्रीलंकेत होता असल्याचा वकिलाचा दावा, अभिनेत्रीचे सर्व आरोप फेटाळले

#metoo Case: ऑगस्ट 2013मध्ये अनुराग श्रीलंकेत होता असल्याचा वकिलाचा दावा, अभिनेत्रीचे सर्व आरोप फेटाळले

दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या वकील प्रियांका खिमानी (Priyanka Khimani) यांनी पायल घोषने केलेल्या तक्रारीबाबत आणि त्यावर अनुरागच्या झालेल्या चौकशीबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे. या निवेदनातून त्यांनी पुन्हा एकदा अनुरागवर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

  • Share this:

मुंबई, 02 ऑक्टोबर : दिग्दर्शक-अभिनेता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) याची गुरुवारी मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली. अभिनेत्री पायल घोष (Payal Ghosh) हिने केलेल्या लैगिक छळाच्या तक्रारीबाबत ही चौकशी करण्यात आली. दरम्यान अनुराग कश्यपच्या वकील प्रियांका खिमानी (Priyanka Khimani) यांनी या प्रकरणाबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे. या निवेदनातून त्यांनी पुन्हा एकदा अनुरागवर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे.

या स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, 'वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये पायल घोष यांनी दाखल केलेल्या एफआयआर नुसार माझ्या क्लायंटने (अनुराग कश्यप) त्यांना ऑगस्ट 2013 मध्ये त्यांना घरी बोलावून त्यांचा लैंगिक छळ केला. यासंदर्भातील तपासामध्ये माझे क्लायंट 01 ऑक्टोबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे गेले आहेत.'

अभिनेत्री पायल घोषने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अनुराग कश्यपला बुधवारी मुंबई पोलिसांनी समन जारी केले होते.  गुरुवारी 11 वाजता अनुरागला चौकशीकरता बोलावण्यात आले होते. त्यानुसार ही चौकशी झाली. अनुरागने सुरुवातीपासून त्याच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. त्याच्या पाठिंब्यासाठी अनेक बॉलिवूडकर देखील उभे राहिले होते.

(हे वाचा-'हॅश है क्या?' ड्रग्जबाबत विचारणाऱ्या ट्रोलरलाच अभिषेक बच्चनने केलं ट्रोल)

या निवेदनात म्हटल्यानुसार अनुराग कश्यपने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप त्याने फेटाळले आहेत. त्याचप्रमाणे अनुराग कश्यप यांनी दिलेल्या पुराव्यावरून अभिनेत्री पायल घोषने केलेले आरोप उघडपणे खोटे असल्याचे अनुराग कश्यप यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. पायल घोषचे आरोप खोटे आहेत हे नमुद करताना या स्टेटमेंटमध्ये असे म्हटले आहे की, 'संपूर्ण ऑगस्ट 2013 मध्ये त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी कश्यप श्रीलंकेत होते आणि त्यासंदर्भातील दस्ताऐवजांचा पुरावा त्यांनी दिला आहे. कश्यप यांनी आरोप करण्यात आलेली अशी काही घटना घडलीच नसल्याचे सांगितले आहे आणि त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.'

अनुरागच्या वकिलांनी पुढे असे म्हटले आहे की, 'न्यायालयीन प्रक्रियेच्या निकालाची पर्वा न करता कश्यप यांची निंदानालस्ती करण्याच्या हेतूने ही कथित 2013 ऑगस्टमधील घटनेबाबत अचानक आणि उशिरा करण्यात आलेले आरोप प्रसारित करण्यात आले. कश्यप यांना विश्वास आहे की ही चुकीची तक्रार लवकरच उघडकीस येईल.'

(हे वाचा-या महिला खासदार दिसणार SOS Kolkata मध्ये, सिनेमाच्या टीजरला नेटकऱ्यांची पसंती)

या घटनेमुळे अनुराग कश्यप यांना आणि त्यांचे कुटुंबीय-मित्रपरिवार यांना खूप त्रास झाल्याचे  या स्टेटमेंटमध्ये नमुद करण्यात आले आहे. अनुराग कश्यप पूर्णपणे कायदेशीर उपायांचा या प्रकरणात पाठपुरावा करणार असल्याचे यात म्हटले आहे.

यामध्ये शेवटी असे म्हटले आहे की, '  कश्यप यांनी या घटनेचा तीव्रपणे निषेध केला आहे. त्यांनी घोष यांच्यावर न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग केल्याबद्दल आणि तिच्या सुप्त हेतूंसाठी मी टू चळवळीचा वापर केल्याबद्द कारवाई करण्याची मागणी केली आहे.'

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 2, 2020, 11:52 AM IST

ताज्या बातम्या