मुंबई, 05 मे : भारतीय म्युझिक इंडस्ट्रीतलं मोठं नाव असलेले व जगभरात ‘कॅसेट किंग’ म्हणून ओळखले जाणारे गुलशन कुमार यांचा आज जन्मदिन. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत; पण त्यांचं आयुष्य हे एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असंच आहे. गुलशन कुमार यांची जीवनगाथा आजही अनेकांसाठी एक प्रेरणा आहे. गुलशन कुमार यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं त्यांच्याबाबतच्या काही खास गोष्टी जाणून घेऊ या. हातगाडीवर विकलं ज्यूस : गुलशन कुमार यांचा जन्म 5 मे 1951 रोजी दिल्लीतल्या एका पंजाबी कुटुंबात झाला. बॉलिवूड म्युझिक प्रत्येक घराघरात पोहोचवणारे गुलशन कुमार यांचे वडील ज्यूस विकायचे. सुरुवातीच्या काळात गुलशन कुमार यांनीही वडिलांसोबत हातगाडीवर ज्यूस विकलं व तिथूनच कॅसेटही विकायला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी आपला व्यवसाय वाढवला व नंतर ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड’ या नावाने स्वतःची कंपनी सुरू केली. दिल्लीत सुरू झालेला त्यांचा व्यवसाय हळूहळू आसपासच्या शहरांमध्येही पसरू लागला. हेही वाचा - ‘शोले’साठी स्वत: टाकीवर चढले होते धर्मेंद्र? की होता स्क्रिप्टचा भाग, 48 वर्षांनी खुलासा असा झाला टी-सीरिज कंपनीचा जन्म : व्यवसाय वाढल्यानंतर गुलशन कुमार बॉलिवूडकडे वळाले. खूप कमी जणांना माहिती आहे, की त्यांनी टी-सीरिज नावाची स्वतःची कंपनी ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड’अंतर्गत स्थापन केली. आज टी-सीरिज ही बॉलिवूड इंडस्ट्रीतली सर्वांत मोठी म्युझिक आणि चित्रपट निर्माती कंपनी आहे. ज्या काळात गुलशन कुमार बॉलिवूडमध्ये यशाच्या दिशेनं झेप घेत होते, त्या दिवसांत अंडरवर्ल्डची भीती इंडस्ट्रीवर पसरली होती. हेही वाचा - Video : होणाऱ्या नवऱ्याबरोबर परिणीती पोहोचली IPL बघायला; कॅमेरा समोर येताच खुदकन लाजलं कपलं खंडणी देण्यास दिला नकार : अंडरवर्ल्ड डॉन त्या काळी अनेकदा चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्याकडून खंडणीची मागणी करत होते. गुलशन कुमार यांच्याबाबतही असचं काहीसं घडलं. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि अबू सालेम यांनी त्यांच्याकडे मोठ्या खंडणीची मागणी केली होती. ती देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून गुलशन कुमार यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.
मंदिरात दिवसाढवळ्या झाली हत्या : गुलशन कुमार यांनी अंडरवर्ल्डकडून येणाऱ्या धमक्यांची तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली होती. परंतु 12 ऑगस्ट 1997 रोजी त्यांचा अंगरक्षक आजारी होता. अंगरक्षक नसतानाही ते मुंबईतल्या एका मंदिरात पूजा करण्यासाठी एकटेच गेले होते. त्याच वेळी दिवसाढवळ्या गुलशन कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या मानेवर आणि पाठीवर एकूण 16 गोळ्या लागल्या आणि या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.