बॉलिवूडच्या सदाबहार सिनेमांमधील एका सिनेमाचं आवर्जुन घेतलं जातं तो सिनेमा म्हणजे शोले. सिनेमाची दमदार स्टारकास्ट, डायलॉग्स आणि गाण्यांमुळे आज 48 वर्षांनी देखील सिनेमा तितकाच आवडीनं पाहिला जातो.
हा सिनेमा कसा लिहिला गेला हे आधी पाहूयात. जावेद अख्तर यांनी त्यांच्या कारच्या बोनेटवर हा सीन घाईघाईत लिहिला.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, "माझ्याकडे नेहमीप्रमाणे पेन पेपर होता. मी एअरपोर्ट निघालो होतो. कारमधून उतरलो आणि कारच्या बोनेटवर तो सीन लिहिला".
शोले सिनेमातील अहमद ही भूमिका साकारणारे अभिनेते सिचन पिळगावकर यांनी धर्मेंद्र यांच्या त्या टाकीवाल्या सीनबाबत खुलासा केला होता.
कपिल शर्मा शोमध्ये सचिन आले होते. तेव्हा त्यांनी याबद्दल सांगितलं. ते म्हणाले, "शोले सिनेमाच्या शुटींगमध्ये धर्मेंद्र पूर्णपणे हेमा मालिनी यांना पटवण्यासाठी तिच्या मागे होते".
सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, "धर्मेंद्र ज्या टाकीवर चढले होते तो स्क्रिप्टचा भाग होता. पण ते ज्या टाकीवर चढले ती टाकी खरी नव्हती".