मुंबई, 07 जून: बॉलिवूडमध्ये सध्या सलमान खानला (Salman Khan) मिळालेल्या धमकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. सलमानला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. सलमान खानला धमकीचं पत्र पाठवणाऱ्यांचा पोलीस तपास करत आहेत. असं असताना आता अभिनेत्री मलायका आरोराच्या (Malaika Arora ) घरीही पोलीस दाखल (Mumbai Police) झाले आहेत. मलायकाचा पोलीसांसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका सोफ्यावर बसली असून पोलीस तिच्या समोर उभे राहून तिची काहीतरी चौकशी करत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच मलायकाची पोलीस चौकशी का करत आहेत असा प्रश्न सर्वांना पडला. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्री मलायका अरोराच्या घरी पोलीस गेले होते परंतू ते मलायकाची कोणत्याही प्रकरणात चौकशी करण्यासाठी गेले नसून मलायका त्यांच्या एका कार्यक्रमाचं आंमत्रण देण्यासाठी गेले होते. मलायका लवकरच मुंबई पोलिसांच्या एका कार्यक्रमात दिसणार आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच अर्जुन कपूरबरोबर असलेल्या रिलेशनशिपमुळेही मलायका सतत चर्चेत असते. दोघांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात येतं. मलायका नुकतीच तुर्कीला सुट्ट्या घालवण्यासाठी गेली होती. तुर्की ट्रिपचे सगळे व्हिडीओ आणि फोटो मलायकाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेत. निर्माता करण जोहरच्या बर्थ डे पार्टीमध्ये देखील मलायकाला स्पॉट करण्यात आलं. हेही वाचा - फेमस रॅपरची गोळ्या झाडून हत्या, संशयाची सुई Girlfriend च्या दिशेनं मलायका अरोरा सध्या सिनेमांपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. मलायका टेलिव्हिजनच्या अनेक शोमध्ये जजींग करत असते. अनेक ब्यूटी कॉन्टेस्ट त्याचप्रमाणे डान्स रिअलिटी शो इंडियास बेस्ट डान्सरमध्ये जजींग करताना दिसली होती. मलायका पुन्हा मोठ्या स्क्रिनवर पाहण्यासाठी तिचे फॅन्स आतूर आहेत. बॉलिवूड सध्या कोरोनाच्या विळख्यात आल्याचं चित्र आहे. अक्षय कुमारसह कतरिना कैफ, आदित्य रॉय कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. करण जोहरच्या बर्थ पार्टीमध्ये 50-55 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बॉलिवूड सध्या कोरोनाच्या सावटाखाली येण्याची शक्यता आहे.

)







