जॉर्जिया, 07 जून: अटलांटाच्या (Atlanta) रॅपर ट्रबलची जॉर्जियामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तो घटनास्थळी मृतावस्थेत आढळून आला. पोलीस या घटनेला घरगुती हल्ला असल्याचा अंदाज लावला आहे. (Rapper Trouble Shot Dead in Georgia) शरीरावर गोळीच्या खुणा यूएसए टुडेच्या वृत्तानुसार, रॉकडेल काउंटी शेरीफचे प्रवक्ते जेडेडियाह कँटी यांनी सांगितले की, 34 वर्षीय ट्रबल लेक सेंट जेम्स अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा होत्या. त्याला जागीच मृत घोषित करण्यात आलं. संशयित अद्याप ताब्यात नाही शेरीफ कार्यालयाने सांगितले की ट्रबलचे खरे नाव मारियल सेमोंटे ऑर (Mariel Semonte Orr)असं होतं. त्याच्या हत्येप्रकरणी संशयित जेमिचेल जोन्ससाठी अटक वॉरंट प्राप्त झाले आहे. मात्र, त्याला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही. संशयित ओळखत नव्हता ट्रबलला शेरीफच्या कार्यालयानुसार, ट्रबल अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये एका मैत्रिणीला भेटायला जात होता. कुठे अचानक परिस्थिती बदलली. डेडलाइनच्या रिपोर्टनुसार, संशयित जोन्स मैत्रिणीला ओळखत होता, मात्र ट्रबल याला ओळखत नव्हता. 2011 मध्ये पहिल्यांदा मिक्सटेप ट्रबलने 2011 मध्ये ‘17 डिसेंबर’ (December 17th)या शीर्षकासह पहिला मिक्सटेप रिलीज केला होता. दरम्यान त्याने 2018 मध्ये ‘एजवूड’ (Edgewood)अल्बम केला. यावर ट्रबलनं सांगितले की, माझे संगीत वैयक्तिक पातळीवर जाते. या माझ्या आयुष्यातील कथा आहेत. मला खरे नाते जोडायला आवडते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.