मुंबई, 06 जानेवारी : मुंबईतील, देशातील राज्यातील माफियांवर आधारीत आजवर अनेक कलाकृती आल्या आहेत. बॉलिवूडमध्येही आजवर रिअल लाइफ माफियावर आधारित अनेक सिनेमे आलेत. ज्यात गॉडफादर, डी कंपनी, शूट आउट एट लोखंडवाला, वन्स अपोन अ टाइम इन मुंबई सारख्या सिनेमांचा समावेश आहे. या सगळ्या कलाकृतींमधून गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या आयुष्यातील कहाणी दाखवण्यात आली. दाऊद हा वर्ल्ड वाइड प्रसिद्ध झालेला माफिया आहे. पण त्याच्या मुंबईतील आतंकवादाची खरी कहाणी सांगणारी ‘मुंबई माफिया: पोलीस वर्सेस द अंडरवर्ल्ड’ ही नवी कोरी सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या दाऊद इब्राहिम या गँगस्टरच्या आयुष्यातील अनेक गोष्टी थोड्या थोड्या करून सिनेमांमधून दाखवण्यात आल्या आहेत. पण नेटफ्लिक्स दाऊद इब्राहिमवर एक नवी कोरी डॉक्युमेंट्री घेऊन आलं आहे. मुंबई माफिया: पोलीस वर्सेस द अंडरवर्ल्ड या डॉक्युमेंट्रीमध्ये दाऊदचं बँकग्राऊंड, त्याच्याशी जोडलेल्या क्राइम स्टोरी आणि अनेक वाद विवाद दाखवण्यात आले आहेत. मुंबई माफिया: पोलीस वर्सेस द अंडरवर्ल्ड पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर पुन्हा सिनेमासारखं काहीतरी पाहायला मिळेल असं वाटलं होतं मात्र ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या डॉक्युमेंट्रीची उत्सुकता वाढली. हेही वाचा - एक्स बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन तर भांडणानंतर सुद्धा भाऊ आणि वहिनी एकत्रच; नेटकरी म्हणाले…
मुंबई माफिया: पोलीस वर्सेस द अंडरवर्ल्डच्या ट्रेलरमध्ये अनेक सत्य घटना दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ट्रेलरच्या सुरुवातीलाच मुंबईत सातत्यानं होणाऱ्या क्राइमनं होते. 90च्या दशकातील अनेक लोक दाऊदबद्दल आणि त्यांच्या आतंकवादाबद्दल सांगत आहेत. अनेक घटना ते डिटेलमध्ये सांगताना दिसत आहेत. सीरिजच्या मेकर्सनी ट्रेलर शेअर करत म्हटलंय, 90च्या दशकात मुंबई क्राइम आणि गँगस्टरच्या आतंकवादानं भरली होती. कायदा आणि अंडरवर्ल्ड यांच्यात लढत सुरू असलेल्या त्या काळात पुन्हा जाऊया. त्यासाठी नेटफ्लिक्सवर मुंबई माफिया रिलीज होत आहे. त्यानुसार 6 जानेवारीला मुंबई माफिया नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. राघव डार आणि फ्रांसिस लॉग्नहर्स्ट यांनी डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केली आहे.