मुंबई, 06 जानेवारी: बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन पुन्हा एकदा त्याच्या नात्यामुळे चर्चेत आला आहे. राजीव सेन आणि चारू असोपा यांच्या लव्ह-हेट रिलेशनशिपने चाहत्यांना गोंधळात टाकले आहे. चारू असोपा आणि राजीव सेन यांच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी आल्या होत्या. चारूने राजीवपासून घटस्फोट जाहीर केला. इतकंच नाही तर त्याच्यावर अनेक गंभीर आरोपही केले. यावेळी गोष्टी इतक्या पुढे गेल्या की चारू असोपा आणि राजीव सेन यांनी कायमचे वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तर राजीवनही चारूवर अनेक गंभीर आरोप केले. पण आता हे चित्र पूर्णपणे पालटलेलं दिसत आहे. चारू असोपा आणि राजीव सेन यांचे वैवाहिक जीवन नेहमीच चर्चेत असते. कधी एकत्र तर कधी वेगळे झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचबरोबर सुष्मिता सेननेही तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलपासून वेगळे झाले आहे. पण कोलकात्यात ही सगळी मंडळी त्यांच्या चुलत भावाच्या लग्नात संपूर्ण कुटुंब एकत्र दिसले. यावेळी राजीवने त्यांची लहान मुलगी जियानाला कडकडून मिठी मारली. राजीव आणि चारुला एकत्र पाहून चाहत्यांनी अनेक विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेही वाचा - Katrina-Vicky : डोक्यावर पदर अन खांद्यावर उपरणं; कतरिना कैफ देसी अंदाजात पोहचली सिद्धिविनायक मंदिरात सुष्मिता सेनचे संपूर्ण कुटुंब कोलकाता येथे एकत्र आले. सुष्मिताचा चुलत भाऊ गौरवच्या लग्नात रोहमन शॉल, दोन्ही मुली रेने, अलिशा, राजीव सेन, चारू असोपा आणि त्यांची मुलगी जियाना एकत्र दिसले. राजीव सेनने इंस्टाग्रामवर लग्नाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. संपूर्ण कुटुंबाला एकाच छताखाली एकत्र पोज देताना पाहून चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांचे कौटुंबिक बाँडिंग पाहून चाहत्यांना आशा होती की राजीव आणि चारू एकत्र येतील.
राजीव सेन यांना फॅमिलीसोबत येण्याचे आवाहन चाहते करत आहेत. एकाने लिहिले ‘तुम्हा दोघांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला’, तर दुसऱ्याने सल्ला दिला- ‘चारूसोबत राहा, तुम्ही दोघेही एकत्र छान दिसता.. मुलाचा विचार करा, पालक होणे सोपे आहे पण त्याग करणे कठीण आहे’. तिसर्याने चारूला परत येण्यासाठी विनवणी केली.
दुसरीकडे, सुष्मिता सेनने सोशल मीडियावर जाहीर केले होते की ती आता रोहमन शॉलसोबत नाही. या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. पण त्यानंतरही हे दोघे अनेकदा एकत्र दिसतात. आताही दोघांना एकत्र पाहून चाहते आनंदी झाले आहेत.