मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

धक्कादायक! मुंबई फिल्मसिटीत स्टंट सीन शूट करणं पडलं महागात; भीषण अपघातात कॅमेरामॅनसह कर्मचारी जखमी

धक्कादायक! मुंबई फिल्मसिटीत स्टंट सीन शूट करणं पडलं महागात; भीषण अपघातात कॅमेरामॅनसह कर्मचारी जखमी

चित्रनगरीत शुटींग सुरू असताना अचानक गाडीचा वेग वाढून हा अपघात घडला आहे.

चित्रनगरीत शुटींग सुरू असताना अचानक गाडीचा वेग वाढून हा अपघात घडला आहे.

चित्रनगरीत शुटींग सुरू असताना अचानक गाडीचा वेग वाढून हा अपघात घडला आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 11 ऑगस्ट : मुंबई फिल्मसिटीत (Mumbai Filmcity)  दिवसभरात अनेक चित्रपट, मालिकांचं शुटींग सुरू असतं. पण शुटींग दिसतं तितक सोपं नव्हे. अनेक लोकांच्या मेहनतीनंतर एक सीन शुट केला जातो. पण याच शुटींग दरम्यान एक भीषण अपघात घडला आहे. चित्रनगरीत शुटींग सुरू असताना अचानक गाडीचा वेग वाढून हा अपघात घडला आहे.

फिल्मसिटीतील खंडाळा रोड या लोकेशनवर 'द गर्ल' नावाच्या चित्रपटाचं शुटींग सुरू होतं. तर यावेळी एका भयानक स्टंटचं शुटींग (Stunt Shooting) सुरू होतं. ज्यात एक कार दूरवरून उडून पलटत खाली पडते असा सीन शुट होणार होता. मात्र कार सीन साठी सोडल्यानंतर तिने आपलं नियंत्रण गमावलं आणि थेट कॅमेरा रेलिंग, कॅमेरा मॅन आणि तिथे उपस्थित काही कर्मचारी व टेम्पोला येऊन धडकली.

या भीषण घटनेत कॅमेरा मॅन जखमी झाला आहे. दरम्यान 10 ऑगस्टला दुपारनंतर 3 ते 4च्या दरम्यान ही घटना घटली होती. त्यामुळे चित्रिकरणाच्या महत्त्वाच्या वस्तूंचंही नुकसान झाल्याचं समजतं आहे. तर चित्रिकरणात यामुळे अडथळा निर्माण झाला आहे.

या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

दरम्यान अनेकदा चित्रिकरणादरम्यान अशा अपघातांना सामोरं जाव लागण्याच्या घटना आधीही घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी एका स्टुडीओला शुटींग दरम्यान भीषण आग लागली होती. तर फिल्मसीटीतच एका मालिकेच्या शुटींग दरम्यान मोठा अपघात होता होता वाचला होता.

First published:

Tags: Accident, Bollywood News, Entertainment, Film