मुंबई, 12 मे: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho) मालिकेतील कलाकार योगेश सोहोनी (Yogesh Sohoni) याला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे येथील शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. योगेश सोहोनी हा ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील शौनक जहागीरदार या पात्राची भूमिका साकारत आहे. योगेश हा मुंबईतील अंधेरी भागात राहण्यासाठी आहे. शनिवारी तो आपल्या कारने मुंबईहून पुण्याच्या दिशेनं निघाला होता. सकाळी आठच्या सुमारास तो उर्से टोल नाक्याजवळ पोहोचला असता एका पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी मागून आली आणि योगेशला हात दाखवून थांबण्याचा इशारा केला. त्यामुळे कार थांबली. धक्कादायक! भलत्याच कारणामुळे पत्नीची गळा आवळून केली हत्या, स्वतःही दिला जीव त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीतील चालकाने तुझ्या कारमुळे माझ्या गाडीचा अपघात झाला आहे, असं सांगून दमगाटी सुरू केली. तसंच, या अपघातात एक जण जखमी झाल्याचं देखील सांगितलं. त्याने योगेशकडे सव्वा लाख रुपये दे नाही, तर तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करेल, अशी धमकीच दिली, असं वृत्त टीव्ही 9 मराठी वाहिनीने दिली. त्यानंतर या स्कॉर्पिओ चालकाने तर हद्द केली. योगेशला बळजबरीने सोमाटणे फाट्याजवळ असलेल्या एटीएममधून 50 हजार रुपये काढण्यास भाग पाडले. ते पैसे घेऊन स्कॉर्पिओ चालक पसार झाला. पैसे दिल्यानंतर योगेशला संशय आला, त्यामुळे त्याने मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर कुठे अपघात झाला आहे का, याची चौकशी केली. पण, अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे त्याच्या लक्षात आले. दिग्गज क्रिकेटपटूनं केली निवृत्तीची घोषणा, WTC फायनल असेल शेवटची मॅच त्यानंतर योगेशने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी आणि लुटमारीची तक्रार दाखल केली आहे. एक्स्प्रेस वेवरील सीसीटीव्ही फूटेज तपासून पोलीस आरोपीची शोध घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.