वेलिंग्टन, 12 मे: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पुढच्या महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. या स्पर्धेचं पहिलं विजेतेपद पटकावण्यासाठी दोन्ही टीमनं तयारी सुरु केलीय. गेल्या 12 वर्षांपासून टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या विकेटकिपर - बॅट्समनसाठी ही फायनल शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असेल. न्यूझीलंडचा विकेट-किपर बॅट्समन ब्रॅडले वॉटलिंग (BJ Watling) यानं या फायनलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं जाहीर केलं आहे. ब्रॅडले वॉटलिंगनं 2009 साली न्यूझीलंडकडून पदार्पण केलं. त्यानं आजवर 249 कॅच घेतल्या आहेत. न्यूझीलंडकडून टेस्ट क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिला आणि एकमेव विकेटकिपर-बॅट्समन आहे. त्यानं 73 टेस्टमध्ये 38.11 च्या सरासरीनं 3773 रन केले आहेत. यामध्ये 8 शतक आणि 19 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे वॉटलिंगनं न्यूझीलंडकडून 5 टी 20 आणि 28 वन-डे मॅच देखील खेळल्या आहेत.
🗣📹 @B_Jwatling in his own words on retiring from all cricket after the @ICC World Test Championship Final in June against India. Watling will leave the game having represented New Zealand more than 100 times and @ndcricket 243 times. #WTC21 pic.twitter.com/isrgA6aoTy
— BLACKCAPS (@BLACKCAPS) May 11, 2021
विल्यमसनचा सर्वात विश्वासू न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन (Kane Williamson) याचा वॉटलिंग हा सर्वात विश्वासू खेळाडू होता. यापूर्वी एकदा विल्यमसनला तुझा जीव वाचवण्यासाठी कोणत्या खेळाडूची निवड करशील ? हा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी त्यानं वॉटलिंगचं नाव घेतलं होतं. इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची काळजी मिटली, BCCI नं घेतला मोठा निर्णय वॉटलिंगचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील दरबनमध्ये झाला. मात्र तो 10 वर्षांचा असतानाच त्याचं कुटुंब न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालं. 2008 साली हॅमिल्टवमधील एका क्लबकडून 378 रनची विशाल खेळी करत त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

)







