मुंबई 18 जून: मराठातील एक परिपूर्ण अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेचं (Mukta Barve) नाव घेतलं जातं. मुक्ता इतकी जास्त गोड आणि आपलीशी वाटते की तिला कधी राग येत असेल का याचा प्रश्न पडतो. अभिनय क्षेत्रात काम करताना कलाकारांना अनेकदा त्यांच्या खऱ्या भावना दाखवता येत नाहीत. काही प्रसंगात त्यांना भान ठेऊन वागावं लागतं. कलाकार हे प्रेक्षकांच्या एवढे जवळ असतात की कधीकधी या गोष्टीचा तोटा सुद्धा होतो. एकूणच कलाकारांच्या आयुष्यावर अभिनेत्री मुक्ता बर्वे बोलती झाली. मुक्ता बर्वे ही एक कुशल अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना माहित आहे. मुक्ता प्रत्येक भूमिका जीव ओतून करते याबद्दल तिचं खूप कौतुक होतं. (Mukta Barve new movie) मुक्ताचा ‘Y’ हा चित्रपट येत्या 24 जूनला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. मराठीतील पहिला हायपरलिंक चित्रपट हा एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आधारित असणार आहे. कल्पनेबाहेरचं जग यात बघायला मिळणार आहे. याच चित्रपटासंबंधी झालेल्या मुलाखतीत मुक्तता न्यूज18 लोकमतशी संवाद साधताना इतर अनेक विषयनावर सुद्धा व्यक्त झाली. मुक्ताला कोणत्या गोष्टीचा राग येतो यावर मुक्ता असं म्हणते, “मला जेव्हा माझ्या घराचा पत्ता, माझा फोन नंबर परस्पर मिळवून कधीही संपर्क करणारे फॅन्स भेटत त्याचा प्रचंड राग येतो. एक कलाकार म्हणून आम्ही सतत त्यांच्या आयुष्याच्या जवळ असतो. ते आम्हाला जवळची व्यक्ती समजतात हे सगळं ठीक आहे आणि याचा आनंद पण आहे. पण अनोळखी लोक जेव्हा माझ्या पर्सनल स्पेसमध्ये येण्याचा प्रयत्न करतात, मला टोपण नावाने हाक मारतात त्याचा मला फार राग येतो.
लोक परस्पर नंबर घेतात आणि मला कळलं करून अचानक तारीफ सुरु करतात. मेनी आहे ते जरी कौतुक असलं तरी ती वेळ चुकीची असते. त्यांना अनेकदा कळत नाही की हे मर्यादा ओलांडणं आहे. त्यांना वाटत प्रेमापोटी ते हे करतात जे चालतं. कधी लोक काळवेळ न पाहता हे सगळं करतात. तेव्हा मी काय मनस्थितीत असेन याची त्यांना कल्पना नसते. कदाचित मी खूप रागात असेन, दुःखात असेन, किंवा खूप आनंदात असेन पण ती माझी पर्सनल स्पेस असेल. त्यात कोणी येण्याचा प्रयत्न केला तर मला आवडत नाही.” हे ही वाचा- Mukta Barve news: लग्नावरून सतत विचारणा करण्याऱ्यांना मुक्ताचं कडक उत्तर! मुक्ताला काय खुपतं यावर तिने फार समर्पक उत्तर दिलं. “स्वतःची ओळख लपवून जगाविषयी वाईट बोलणारे, कलाकारांना ट्रोल करणारे ट्रोलर्स खूप जास्त खुपतात.” असं ती सांगते.