मुंबई 18 जून: आजकाल अभिनेत्रींना एका वयानंतर लग्नाबाबदल सतत विचारणा केली जाते. अमुक एका वयानंतर सुद्धा अभिनेत्री रिलेनशिपमध्ये नसतील तर त्यांना अनेकदा बोललं जातं. असा अनुभव अभिनेत्री मुक्ता बर्वेला (Mukta Barve) सुद्धा अनेकदा आला आहे. मुक्ता चाळीशीत पोहोचली असली तरी अजूनही सिंगल (Is Mukta Barve Single) आहे पण तिला अनेकदा लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला जातो. असा प्रश्न विचारणाऱ्यांना मुक्ताने सणसणीत उत्तर दिलं आहे. मुक्ता बर्वे ही एक कुशल अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना माहित आहे. नाट्यशात्राचं शिक्षण घेतलेली मुक्ता प्रत्येक भूमिका जीव ओतून करते. मुक्ताचा ‘Y’ हा चित्रपट येत्या 24 जूनला रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. मराठीतील पहिला हायपरलिंक चित्रपट हा एका महत्त्वाच्या विषयावर आधारित चित्रपट असणार आहे. याच चित्रपटासंबंधी झालेल्या मुलाखतीत मुक्ता न्यूज18 लोकमतशी संवाद साधताना इतर अनेक विषयनावर सुद्धा व्यक्त झाली. मुक्ताला अनेकजण सतत लगनबद्दल विचारणा करताना दिसतात. याचा तिला त्रास होतो किंवा चिडचिड होते का असं तिला विचारल्यावर ती असं म्हणते, “मी अशा प्रश्नांना गांभीर्याने घेत नाही. मला असं वाटतं की हा खूप वैयक्तिक निर्णय आहे. एखाद्या स्त्रीने लग्न करणं किंवा न करणं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. याविषयी कोणीही कोणाला विचरण मला बरोबर वाटत नाही. एखाद्या व्यक्तीला फक्त ती अभिनेत्री आहे म्हणून किंवा तुम्हाला माहित आहे म्हणून विचारणं बरोबर नाही. केवळ कलाकार आहोत म्हणून तुमच्या मर्यादा सोडून एखाद्याला असा खाजगी प्रश्न विचारणं मला वाह्यात वाटतं.
पण प्रत्येकाची शाळा घेणं काही शक्य नसत त्यामुळे मी सोडून देते फार विचार करत नाही.” हे ही वाचा- आपल्या पतीपेक्षा जास्त कमावतात ‘या’ TV अभिनेत्री; एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी रक्कम मुक्ताने अनेकदा लग्नाला धरून हे स्पष्ट केलं आहे की तिला लग्न ही गरज वाटत नाही. ती आत्ता आनंदी आहे आणि याहून अधिक जर तीच सुख आणि आनंद वाढणार असेल तरच ती लग्न करेल असं तिने वारंवार सांगितलं आहे. असं असूनही तिला हा प्रश्न अनेकदा विचारला जातो त्या सर्वांना कडक आणि मस्त उत्तर तिने दिलं आहे.