Home /News /entertainment /

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज; 'वाय' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज; 'वाय' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज; 'वाय' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज; 'वाय' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

'पांडू' (Pandu) 'झिम्मा' (Jhimma) 'पावनखिंड' ( Pawankhind) 'शेरशिवराज हैं' (Sher Shivraj Hai ) सारख्या चित्रपटानंतर 'वाय' ( Y the Film) धमाकेदार आणि थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वे चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचं पोस्टर नुकतचं प्रदर्शित झालं आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 26 मे:  अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) नेहमीच नवीन चांगल्या आशयाचे आणि विषयाचे चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. आजवर अनेक भूमिकांमध्ये आपण मुक्ताला पाहिले आहे. असाच एका चित्रपट मुक्ता बर्वे घेऊन आलीय ज्याच नाव आहे 'वाय' (Y the Film). गेल्या अनेक दिवसांपासून 'वाय' या चित्रपटाची चर्चा आहे.  चित्रपटाचा फर्स्ट लुक आहे प्रदर्शित झाला असून पोस्टरमधून अभिनेत्री मुक्ता बर्वेचा अनोखा अंदाज समोर आला आहे. वाय चित्रपटाच्या पोस्टमध्ये मुक्ता बर्वे आक्रमक अंदाजात दिसत आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन चित्रपटात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार असं दिसून आलं आहे. या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे एका आक्रमक अंदाजात हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे. तिचा हा लढा नेमका कोणासाठी आणि का आहे,  या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रथितयश कलाकार आहेत. मात्र सध्या तरी त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत.मुक्ताचा वाय चित्रपटातील लुक पाहून तिच्या रुद्रम या मालिकेची आठवण होत आहे. या मालिकेतही तिने अनेक भूमिका वठवल्या होत्या. मुक्ताचा हा अक्रमक अवतार तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. मागील काही महिन्यांपासून मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'पांडू', 'झिम्मा', 'पावनखिंड', 'शेरशिवराज हैं' सारख्या चित्रपटानंतर आणखी एक धमाकेदार आणि थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   गेल्या आठवड्यात मराठी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी वाय या चित्रपटाला आपला ' पाठिंबा ' दर्शविला आहे. चित्रपटाच्या पोस्टरची सध्या सोशल मीडिया वर बरीच चर्चा आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Y The Film (@ythefilm)

  'अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते...? अस्तित्वाच्या या लढ्यात 'ती' येतेय... स्वतः मशाल होऊन...! वाय', असं कॅप्शन देत मुक्ताने तिच्या सोशल मीडियावरुन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. हेही वाचा - हेमांगी कवीला विदाआऊट मेकअप पाहून नेटकऱ्यांनी केली अजब मागणी, अभिनेत्री म्हणाली, 'पावडरची गरज त्यांना...' वाय हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अजित सुर्यकांत वाडीकर यांनी म्हटले, ‘या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने सुरू केलेल्या उपक्रमाला मान्यवर कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच  सर्वसामान्यांनीही पाठिंबा दिला आहे. अगदी राजकीय नेतेही त्यात मागे नाहीत. खुर्चीला खिळवून ठेवतानाच प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा थरारपट  मराठीतील पहिलाच हायपरलिंक चित्रपट असेल. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ' हायपरलिंक ' हा मराठी चित्रपटाचा नवीन आकृतिबंध प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.’
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi entertainment, Mukta barve

  पुढील बातम्या