मुंबई, 25 मे- अभिनेत्री हेमांगी कवी ( Hemangi Kavi) सोशल मीडियार प्रचंड सक्रीय असते. हेमांगी विविध विषयावर सोशल मीडियावर व्यक्त होत असते. तिचं मत ती स्पष्टपणे मांडताना दिसते. अनेकदा तिला यामुळे ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागला आहे. मात्र काही मोजक्याच अभिनेत्री आहेत ज्या महिलासंबंधी असेल किंवा सामजिक घटनेवर असं बोलताना दिसतात. याशिवाय ती तिचे काही भन्नाट व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच हेमांगीनं तिचा विदाऊट मेकअप असा सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिनं सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. सध्या तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. ‘तू ना सही, तेरी यादें सही.. मैं हूँ वही और तू भी…. वही ❤️’ असं म्हणत हेमांगीनं तिचा विदाऊट मेकअप एक व्हिडिओ फेसबुकला शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती गॅलरीत चहा पिताना दिसत आहे. तिचा हा लुक चाहत्यांना देखील आवडलेला आहे. एका चाहतीनं तर हेमांगीचा हा व्हिडिओ पाहून तिच्याकडे स्कीन केअर रूटींगवर (skin routine) व्हिडिओ बनवण्याचीच विनंती केली आहे. तिनं म्हटलं आहे की, मला तुमची स्कीन खूप आवडते..तुमच्या स्कीन केअर रूटींगवर एक व्हिडिओ बनवा की..असे मागणी केली आहे. यावर हेमांगीनं देखील रिप्लाय देत लगेच होकार कळवला.
मात्र हा विषय एवढ्यात थांबला नाही. लगेच एकाच चाहतीनं काय गरज नाही पावडरची..तुम्ही कुठल्याही रूपात छान दिसता.. बाकी ज्याचा त्याचा बघायाच दृष्टीकोन अशी कमेंट केली. चाहतीच्या या कमेंटला हेमांगीनं देखील, पावडरची गरज त्यांना, ज्यांना confidence नाही 😊 असं म्हणतं लगेच उत्तर दिलं.हेमांगीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्या लुकचं कौतुक केलं आहे. ओरिजनल ते ओरिजनल म्हणत तिच्या विदाआऊट मेकअप लुकची प्रशंसा केली आहे.
हेमांगीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फू बाई फू’ या शोमध्ये देखील हेमांगी कवी दिसली होती. त्यानंतर ‘मिसेस मुख्यमंत्री’ या 2019 साली प्रदर्शित झालेल्या मालिकेमध्ये तिने रागिणी शिंदे हे पात्र निभावले हाेते. 2020 साली प्रदर्शित झालेल्या ‘मडडम सासू धडडम सून’ या मालिकेमध्ये हेमांगीने काम केले आहे.हेमांगीने 2020 साली स्टार भारत या वहिनी वरील ‘तेरी लाडली मै’ या मालिकेत उर्मिला हे पात्र निभावले होते. हेमांगीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 2008 साली प्रदर्शित झालेल्या रंगी बेरंगी या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती पिपाणी, पेच, फक्त लढ म्हणा, गोळा बेरीज, धर्मांतर, मनातल्या मनात, कोण आहे रे तिकडे, धुडगूस या चित्रपटात झळकली होती.

)







