मुंबई, 13 जून: गेली अनेक दिवस मराठीत एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे 'वाय' (Y the Film) सिनेमाच्या नावामुळे सिनेमाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रश्नांची उत्तर 24 जूनला प्रेक्षकांना मिळणार आहेत. मात्र त्या आधी सिनेमाची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भटीला आला आहे ( Y Film Trailer Release) 'वाय'चा ट्रेलर लाँचिंग सोहळा नुकताच पार पडला. सोहळ्याला सिनेमाच्या संपूर्म टीमने हजेरी लावली होती. 'वाय' हा मराठीतील पहिला हायरलिंक सिनेमा ( first hyperlink marathi film Y) असून मराठीत होऊ पाहणाऱ्या या नव्या प्रयोगासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. मराठी सिनेसृष्टीमध्ये चर्चेत असलेल्या या वाय सिनेमात मुक्ता बर्वे (Mukta Barve) ची प्रमुख भूमिका आहे. 'वाय' या शब्दामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. सिनेमा सत्य घटनांवर आधारित असून आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची, अस्तित्वासाठीच्या संघर्षाची कहाणी सिनेमात दाखवण्यात येणार आहे. मल्टिस्टारकास्ट असलेल्या सिनेमात भायण वास्तव समोर येणार आहे.
'वाय'च्या पहिल्या पासूनच सिनेमाविषयी अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाले होते. त्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता 'वाय'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये मुक्ता बर्वे ही एका शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ती कार्यरत असलेल्या क्षेत्रात काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत.या घटनांचा शोध मुक्ता यात घेताना दिलतेय.
घडणाऱ्या धक्कादायक घटना दर महिन्याच्या अखेरच्या शुक्रवारी का घडत आहेत? या घटनांमागे काही दृश्य आणि अदृश्य हात आहेत. ज्यातील काही मदतीसाठी आहेत तर काही घात करणारेही आहेत. या सर्व गोष्टींचा शोध घेताना मुक्ता दिसत आहे. ट्रेलरमधून इंटरेस्टिंग गोष्ट प्रेक्षकांसमोर आली आहे. आता मुक्ताला या शोधात यश मिळणार की तिचा हा शोध अपूर्णच राहणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ‘वाय’ पाहिल्यावर मिळणार आहेत.
सिनेमात मुक्ताबरोबर अभिनेत्री प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओमकार गोवर्धन, रसिका चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक हे कलाकार आहेत. त्याचप्रमाणे रोहित कोकाटे, संदीप दंडवते, प्रदीप भोसले आदी कलाकारही आहेत.
अजित सूर्यकांत वाडीकर यांनी सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन केलं आहेत. तर कन्ट्रोल -एन प्रॉडक्शन्सनं सिनेमाची निर्मित केली आहे. ‘वाय’ चे दिग्दर्शक अजित सूर्यकांत वाडीकर म्हणतात, ‘’ ही एक वास्तववादी कथा आहे. आपल्या आजुबाजुला अशा अनेक घटना घडत असतात, मात्र आपण त्यापासून अनभिज्ञ असतो. ‘वाय’ च्या निमित्ताने हे भयाण वास्तव प्रेक्षकांच्या समोर आणण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ‘वाय’ बघून प्रेक्षक अंतर्मुख होऊन नक्कीच विचार करायला लागतील, अशी आशा व्यक्त करतो.’’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Movie release, Mukta barve, Upcoming movie