जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता प्रियदर्शन जाधवचं 25वं नाटकं ‘हसता हा सवता’ प्रेक्षकांच्या भेटीला; पार्ले येथे रंगणार शुभारंभाचा प्रयोग

अभिनेता प्रियदर्शन जाधवचं 25वं नाटकं ‘हसता हा सवता’ प्रेक्षकांच्या भेटीला; पार्ले येथे रंगणार शुभारंभाचा प्रयोग

 अभिनेता प्रियदर्शन जाधवचं 25वं नाटकं ‘हसता हा सवता’ प्रेक्षकांच्या भेटीला; पार्ले येथे रंगणार शुभारंभाचा प्रयोग

अभिनेता प्रियदर्शन जाधवचं 25वं नाटकं ‘हसता हा सवता’ प्रेक्षकांच्या भेटीला; पार्ले येथे रंगणार शुभारंभाचा प्रयोग

नाटक ज्याचा श्वास आहे, नाटक ज्यासाठी सर्वकाही आहे, रंगभूमीशी ज्याची अनोखी नाळ जोडली आहे असा अभिनेता प्रियदर्शन जाधव ( Priyadarshan Jadhav) त्याचं 25वं नाटक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘हसता हा सवता’ ( Hasata Hasavata) या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग 17 जूनला होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 जून: ‘टाइमपास 2’ ( Timepass 2)  ‘धुरळा’ (Dhuarala) ‘ये रे ये रे पैसा’ ( Ye Re Ye Re Paisa) सारखे सुपरहीट सिनेमे त्याचप्रमाणे  ‘मोरुची मावशी’ (Moruchi Mavshi)  ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ सारख्या दमदार नाटकातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सर्वांचा लाडका अभिनेता प्रियदर्शन जाधव ( Priyadarshan Jadhav) प्रियदर्शनची ओळख रंगभूमीवरील अभिनेता म्हणून सर्वाधिक झाली. रंगभूमीशी प्रियदर्शनचं खास नात आहे. याच रंगभूमीवर नवं नाटक घेऊन प्रियदर्शन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘हासता हा सवता’ ( Hasata Hasavata) हे नवं नाटक रंगभूमीवर येत आहे. प्रियदर्शनच्या आयुष्यातील हे 25वा नाटक ठरलं आहे. नाटकांच्या शुभारंभाचा प्रयोग येत्या  17 जूनला पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात संध्याकाळी 4 वाजता रंगणार आहे. प्रियदर्शनच्या नव्या नाटकासाठी त्याच्यावर सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधवही त्याच्या 25व्या नाटकाच्या निमित्तानं फार उत्साही असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर प्रियदर्शन नाटकाच्या रिअसल्सचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे.  नाटकात प्रियदर्शन जाधव मध्यवर्ती भूमिकेत असणार आहे. प्रियदर्शनसह नाटकात अभिनेते अमोल बावडेकर ( Amol Davdekar) अश्विनी जोशी (Ashwini Joshi)  श्रद्धा पोखरणकर (Shraddha Pokharankar)  प्रसाद दाणी ( Prasad Dani)  हे कलाकार दिसणार आहेत. या नाटकाची निर्मिती भाऊसाहेब भोईर यांनी केली तर  सुत्रधार भैरवनाथ शेरखाने आहेत.

जाहिरात

‘हसता हा सवता’ हे नवं कोरं नाटक महात्मा फुला यांच्या ‘मालकी हक्क गाजवण्यापेक्षा प्रेम करू’  या वाक्यावर आधारलेलं आहे. कौटुंबिक विषय असला तरी निराळ्या पद्धतीने लेखक अभिराम भडकमकर यांनी याची मांडणी केली आहे. अभिराम भडकमकरआणि कुमार सोहोनी ही जोडगोळी नाटकातून प्रेक्षकानां काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रियदर्शन जाधवचं हे 25 वा नाटक आहे तर नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहोनी यांच्या दिगदर्शनाची ४९वर्षे पूर्ण झाली असून ५०व्या वर्षातले हे पहिलेच नाटक आहे.  नाटकाची प्रकाशयोजना त्यांनीच केली असून पुरुषोत्तम बेर्डेचं संगीत नाटकाला लाभलं आहे.  नेपथ्य बाबा पार्सेकर यांचे आहे. ‘हसता हा सवता’ हे नाटक प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करेल असा विश्वास नाटकाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात