मुंबई, 08 जून: कल्पनेपलिकडीत वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ (Y the Film) या नव्या मराठी सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. ‘वाय’ या सिनेमाच्या नावामुळेच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरपासूनच सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. सिनेमाची उत्सुकता आणखी वाढवत सिनेमाचा आणखी एक नवा टीझर (Y New Teaser) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वेनं (Mukta Barve) सिनेमाचा नवा टिझर तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. सिनेमाचा नवा टीझर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेल पोहोचली असून टिझरवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘ती’च्या पाठी आहेत काही दृश्य-अदृश्य हात, काही करण्या मदत, तर काही करण्या घात… सावध रहा… ते येत आहेत…घेऊन वास्तवाचा हायपरलिंक थरार!’, असे जबरदस्त कॅप्शन देत मुक्ताने नवा टिझर शेअर केला आहे. आता यातील ‘ती’ कोण असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
आपण पाहिलं तर सिनेमाच्या पहिल्या टिझरमध्ये मुक्ताच्या अंगावर कुत्रा धावून आल्याचं दाखवण्यात आलं होतं. कुत्रा मुक्ताकडे का झेपावत आहे? नक्की काय घडतंय? कशासाठी घडतंय? असे प्रश्न पडलेले असताना आता सिनेमाच्या नव्या टिझरने नवे प्रश्न निर्माण केले आहेत. हेही वाचा - PHOTO: मालिकांमध्ये लगीन घाई! नेहा-यश, शांतनू-पल्लवीनंतर कोणती जोडी बांधणार लगीनगाठ? नव्या टिझरमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि भिती दिसत आहे. शेवटी एक माणूस कोणाचातरी खून करण्यासाठी पुढे जात आहे.
टिझर पाहून चाहत्यांनी सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. एका युझरने म्हटलंय, ‘थेटरात जाळ आणि धूर संगटच’, दुसऱ्या युझरने म्हटलंय, ‘मराठीत हायपरलिंक सिनेमा येतोय ही मोठी गोष्ट आहे’. तर अनेकांनी टिझरमध्ये मुक्ता आणि प्राजक्ताला पाहून प्रेमाचा वर्षाव केलाय. वाय सिनेमात मल्टिस्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री मुक्ता, प्राजक्ता माळी, नीना कुळकर्णी, ओमकार गोरधन, संदीप पाठक, नंदू पाठक हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अजित सूर्यकांत वाडीकर यांनी सिनेमाची कथा लिहिली आहे. कंट्रोल एन प्रॉडक्शन्सने सिनेमाची निर्मिती केलीय. पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत.

)







