कलर्स मराठीवर 'लेक माझी दुर्गा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील नुकतंच जयसिंग आणि दुर्गाचं लग्न झालं.
मोठ्या आईनं दिलेल्या शब्दानुसार शांतनू आणि पल्लवी यांचं पुन्हा थाटामाटात लग्न लावून दिलं आहे. त्यामुळे स्टार प्रवाहवरील मालिकेत सध्या शांतनू पल्लवीच्या लग्नाची चर्चा आहे.
प्रेक्षक ज्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते यश आणि नेहा यांच्या लग्नाची. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशमीगाठ' मालिकेत यश आणि नेहाच्या लग्नाचा ग्रँड एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
यश नेहाच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत. सिल्वासा येथे मालिकेचं शुटींग करण्यात आलं आहे.
यशच्या लग्नात शेफाली आणि समीर यांचेही सुर जुळले आहेत. त्यामुळे येत्या भागात शेफाली आणि समीर यांचंही लग्न पाहायला मिळणार आहे.
त्याचप्रमाणे अरुंधती आणि आशुतोषची मैत्री हळूहळू खुलू लागली आहे. काही दिवसात दोघांचं लग्न होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.