मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

रणबीर कपूरनं लग्न का केलं नाही?; आईनंच सांगितली अभिनेत्याची वाईट सवय

रणबीर कपूरनं लग्न का केलं नाही?; आईनंच सांगितली अभिनेत्याची वाईट सवय

रणबीर कधीच स्वत:हून मुलींडे जात नाही, मुलीच त्याच्याकडे येतात, तो खूप हळवा आहे. नितू कपूर यांनी रणबीरच्या रिलेशन्स वर केल भाष्य

रणबीर कधीच स्वत:हून मुलींडे जात नाही, मुलीच त्याच्याकडे येतात, तो खूप हळवा आहे. नितू कपूर यांनी रणबीरच्या रिलेशन्स वर केल भाष्य

रणबीर कधीच स्वत:हून मुलींडे जात नाही, मुलीच त्याच्याकडे येतात, तो खूप हळवा आहे. नितू कपूर यांनी रणबीरच्या रिलेशन्स वर केल भाष्य

  • Published by:  News Digital

मुंबई, 15 एप्रिल: अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) त्याच्या अफेअर्समुळे कायमचं चर्चेत राहीला आहे. आजवर अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं होतं. तर काहींसोबत तो रिलेशनशिप मध्ये देखिल होता. याशिवाय वुमन्स मॅन (women's man) अशीही रणबीरची ओळख आहे.  नुकतंच रणबीरची आई व अभिनेत्री नितू सिंग (Neetu singh) यांनी रणबीरच्या फसलेल्या रिलेशनशिप्स बद्दल भाष्य केलं आहे.

नितू कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की रणबीरचा हळवा स्वभाव आहे आणि त्यामुळे त्याला मुलींना नाही म्हणता येत नाही, आणि त्यामुळेच तो चुकीच्या नात्यात अडकतो. “तो खूप हळवा आहे. तो कोणालाही दुखवू शकत नाही. आणि हेच त्याच्या अफेअर्स बाबतीत घडतं, त्याला नाही म्हणणं माहीत नाही, आणि त्यामुळे तो चुकीच्या नात्यात अडकतो. आणि हे होत आहे आणि मी काहीच करू शकत नाही”. नितू म्हणाल्या.

पुढे नितू कपूर म्हणाल्या, “जेव्हा तो पहिल्यांदा प्रेमात पडला, मला माहित होत ती मुलगी योग्य नाही. पण जेव्हा मी त्याला समजवायला गेले, तो भांडू लागला. तेव्हा मी वेगळ्या पद्धतीने प्रकरण हाताळायला शिकले.”

रणबीर अभिनेत्री दिपिका पादूकोन (Deepika Padukone) सोबत रिलेशनशिप मध्ये होता, अनेक वर्षे त्यांचं अफेअर सुरू होत. तर दिपिकाने रणबिरच्या नावाचा टॅटू देखिल काढला होता, जो तिने अलिकडेच लग्न झाल्यानंतर काढून टाकला होता. त्यानंतर अभिनेत्री कॅटरीना कैफ (Katrina Kaif) सोबतही रणबीरचं काही वर्षे नांतं होत तर अनेकदा त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या होत्या पण कालंतराने त्यांचं ब्रेकअप झालं. यानंतरही रणबीरचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेल होतं. त्यात पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानचं (Mahira Khan) ही नाव सामिल आहे.

ऋषभ पंतने उर्वशी रौतेलाला whatssapp वर का केलं होतं ब्लॉक; अखेर खुलासा झालाच!

रणबीरच्या जुन्या रिलेशनशिप्स बद्दल बोलताना नितू म्हणाल्या, “तो खूप प्रतिभावान आहे, पण त्याच बरोबर तो लाजाळू देखिल आहे. मी त्याला कधीच स्वत:हून मुलींकडे जाताना पाहिलं नाही. मुली स्वत:हून त्याच्याकडे येतात. व तो खूप हळवा असल्याने नाही म्हणत नाही आणि मग नात्यात अडकतो”. नितू यांनी रणबीरला रिलेशनशिपमध्ये लगेच सिरीअस न होण्याचा सल्ला दिला होता.

रणबीर सध्या अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सोबत रिलेशनशिप मध्ये आहे. व नितू कपूर देखिल तिला पसंत करत असल्याचं दिसून येत आहे. कपूर कुटुंबाच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमांना ती हजेरी लावत असते. तर त्यांचे चाहते आता त्यांच्या विवाहची वाट पाहत आहेत.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Deepika padukone, Ranbir kapoor, Women