जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Ani Me: 'तेव्हा आईच्या डोळ्यात मला आग दिसली','त्या' रात्री हिरकनी बनून आईने वाचवलेला सोनालीचा जीव

Aai Ani Me: 'तेव्हा आईच्या डोळ्यात मला आग दिसली','त्या' रात्री हिरकनी बनून आईने वाचवलेला सोनालीचा जीव

सोनाली कुलकर्णीच्या आईचा चकित करणारा किस्सा

सोनाली कुलकर्णीच्या आईचा चकित करणारा किस्सा

Mother’s Day 2023 Special Story: ‘आई’ या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत पण आईरुपी स्त्रीमध्ये नभाइतकं सामर्थ्य आहे असं आपण अनेकवेळा वाचलं आहे. आणि हे खरंसुद्धा आहे. आई आपल्या लेकरासाठी हवं ते करायला तयार असते. प्रत्येक बाळासाठी त्याची आई ही हिरकणीच असते.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 13 मे- ‘आई’ या शब्दात फक्त दोनच अक्षरे आहेत पण आईरुपी स्त्रीमध्ये नभाइतकं सामर्थ्य आहे असं आपण अनेकवेळा वाचलं आहे. आणि हे खरंसुद्धा आहे. आई आपल्या लेकरासाठी हवं ते करायला तयार असते. प्रत्येक बाळासाठी त्याची आई ही हिरकणीच असते. आपलं बाळ कितीही मोठं झालं तरी आईला नेहमीच त्याची काळजी आणि माया वाटतच असते. सर्वसामान्य लोक असो किंवा सेलिब्रेटी प्रत्येकाचं आपल्या आईसोबत तितकंच गोड नातं असतं. असं म्हटलं जातं प्रत्येक मुलीसाठी तिची आई हीच तिची पहिली मैत्रीण असते. मराठमोळ्या सोनाली कुलकर्णी चंदेखील असंच आहे. सोनाली आपल्या आईच्या फारच जवळ आहे. ती आपली प्रत्येकी गोष्ट आईसोबत शेअर करते. आपण आज जे काही आहे ते केवळ आणि केवळ आपल्या आईमुळे असं ती आवर्जून सांगते. आपल्या अभिनयन आणि सौंदर्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या अप्सरेला आजही बालपणातील ते लहान-लहान किस्से आठवायला आवडता. शिवाय अभिनेत्रीने आपल्या आईचा एक असाही किस्सा शेअर केला आहे ज्यातून त्यांचं बलाढ्य सामर्थ्य स्पष्ट दिसून येते. यंदाच्या मातृ दिना निमित्त आपण सोनाली कुलकर्णी आणि तिच्या आईबाबत घडलेला एक किस्सा जाणून घेणार आहोत. (हे वाचा: मृण्मयी देशपांडेने सिनेसृष्टीला केलं रामराम?मुंबई सोडून महाबळेश्वरला शिफ्ट झाली अभिनेत्री; आता करतेय शेती ) सोनाली कुलकर्णीने सुरुवातीला मॉडेल म्हणून आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यांनंतर तिने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे सोनालीला आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कारसुद्धा मिळाला होता. अभिनेत्रीने डेब्यू चित्रपटातूनच सर्वांचं लक्ष वेधलं होतं. सोनालीने ‘नटरंग’, ‘अजिंठा’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘हंपी’, पांडू अशा कित्येक सिनेमांतून दमदार अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणून सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं. सोनाली कुलकर्णीचा जन्म पुण्याजवळील खडकी याठिकाणी झाला होता. खरं सांगायचं तर सोनाली लष्करी छावणीत जन्माला आली होती. वाटलं ना आश्चर्य? हो हे खरं आहे. सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर कुलकर्णी हे भारतीय सैन्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.त्यांनी तब्बल 30 वर्षे या क्षेत्रात काम करत देशसेवा केली आहे. सोनाली कुलकर्णीच्या आईबाबत सांगायचं तर, अनेकांना माहिती नसेल सोनालीची आई ही मूळची पंजाबची आहे. त्यांचं नाव सविंदर कुलकर्णी असं आहे. सोनालीच्या आई कामानिमित्त पंजाब सोडून महाराष्ट्रात आल्या होत्या. याठिकाणी त्यांनी काम करत स्वतःच अस्तित्व निर्माण केलं आहे. तसेच त्या सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांच्याशी लग्न करत कायमस्वरुपी महाराष्ट्रातच स्थायिक झाल्या आहेत. सोनाली नेहमीच सांगते आज मी जी आहे ती फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे. कारण तिचे बाबा सैन्यात असल्याने ते नेहमीच ड्युटीवर असायचे. ते वर्षातून केवळ तीनदा घरी यायचे. याकाळात सोनालीची आईच तिची आणि त्याच्या भावाची संपूर्ण जबाबदारी घ्यायची. (हे वाचा: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर कधी पाहिलंय का?सिध्दार्थ जाधवने शेअर केले फोटो ) सोनाली सांगते की, आई पावसाळयात भिजत मला आणि भावाला शाळेला सोडत असे, पुन्हा शाळा सुटल्यावर घरी घेऊन येत असे. आमच्यासाठी डबा तयार करुन पुन्हा आपल्या ऑफिससाठी जात से. तसेच आईने आपल्यातील कलेची आवड लहानपणीच हेरली होती. त्यामुळेच तिने आपल्याला डान्स क्लासला घातल्याचं सोनाली सांगते. शाळेतून आई डान्स क्लासला घेऊन जात असे आणि पुन्हा ऑफिससाठी परतत असे. असं सगळं स्ट्रगल आईने कोणीतीही कुरबुर न करता केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.

जाहिरात

सोनाली आणि आईसोबत घडलेला एक किस्सा सांगताना सोनालीने सांगितलं की, त्याकाळात ती ऑडिशन देत होती तेव्हा पुण्याहून मुंबई असा प्रवास नेहमी करावा लागे कारण त्याकाळात मुंबईत त्यांचं घर नव्हतं. एकदा एका ऑडिशनसाठी गेले असता यायला अतिशय वेळ झाला होता. रात्रीचे जवळपास साडे बारा-एक वाजले असतील. यावेळी ती आणि तिची आई दोघीच प्रवास करत होत्या. अशातच वाशी टोल नाक्याजवळ येताच त्यांची गाडी बंद पडली. तब्बल एक-दीड तास खटाटोप करुनसुद्धा गाडी काही सुरु झाली नाही. तेवढ्यात एका ट्र्क ड्रॉयव्हरने येऊन त्यांची मदत केली. त्यांनतर पुढे एकेठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी त्यांनी गाडी थांबवली. पुन्हा गाडी सुरु करुन प्रवासाला सुरुवात करणार इतक्या एका व्यक्तीने धाडकन त्यांच्या गाडीवर उडी घेतली. यामुळे त्या दोघीही घाबरल्या.

News18लोकमत
News18लोकमत

या दोघी महिला एकट्या असल्याचं पाहून त्याने लुटण्याचा प्रयत्न सुरु केला. सोनाली या प्रकाराने प्रचंड घाबरली होती. ती आपल्या ऐके आशेने पाहात होती. याबाबत सांगताना अभिनेत्री म्हणते, ‘त्यावेळी माझ्या आईच्या डोळ्यात आग दिसत होती. तिने गाडी फुल स्पीडममध्ये सुरु केली. आणि आता काहीही झालं तरी गाडी थांबवणार नाही या अर्थाने तिने गाडीचा वेग वाढवला. आणि यात तिच्या आईला यश आलं. तो माणूस काही अंतरावर जाताच खाली कोसळला आणि या दोघींची सुखरूप सुटका झाली.यावेळी आपल्या आईचं धाडस पाहून सोनालीने आईला सलाम केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात