मुंबई, 16 मार्च : आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजेच मोहनीश बहल. हा अभिनेता बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसलेला नाही. मोहनीशने नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला. नकारात्मक भूमिका करूनही मोहनिशने लोकांची मने जिंकली आणि करिअरला नवी दिशा मिळाली. जाणून घ्या या अभिनेत्याच्या आयुष्यातील रंजक गोष्टी… मोहनीश बहलने 1983 साली ‘बेकरार’ या चित्रपटातून सहाय्यक भूमिकेतून आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. पण त्याचा हा चित्रपट काही खास कमाई करू शकला नाही. यानंतर त्याने एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. अजून एखादा चित्रपट फ्लॉप झाला असता तर त्याला चित्रपटसृष्टीचा कायमचा निरोप घ्यावा लागला असता. पण अशातच त्याच्या पदरी एक हिट चित्रपट आला आणि त्याचं नशीबच उजळलं. हा चित्रपट होता सलमान आणि भाग्यश्रीचा ‘मैने प्यार किया’. हा चित्रपट प्रचंड हिट झाला आणि मोहनिशच्या करिअरला नवी दिशा मिळाली. ‘या’ अभिनेत्रीचं संजय दत्तवर जडलं प्रेम; वडिलांनी दुसऱ्याशीच लग्न लावलं अन् नवऱ्यानं 30 वर्ष छळलं ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात मोहनीश सलमान खानच्या विरूद्ध खलनायकाच्या भूमिकेत दिसला. सलमान आणि भाग्यश्री सोबतच त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. पण या चित्रपटानंतर ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ साथ है’मध्ये सलमानचा संस्कारी मोठा भाऊ म्हणूनही लोकांनी त्याला खूप प्रेमही दिले. पण मैने प्यार किया या चित्रपटातून मोहनीशने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आलेल्या अपयशावर राजश्रीच्या मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे मात केली होती. हा चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. मोहनीश हा हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध यशस्वी अभिनेत्री नूतन यांचा मुलगा आहे, पण त्याने मेहनतीच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
मोहनीश आणि सलमानमध्ये नेहमीच चांगली मैत्री राहिली आहे. ‘हम आपके है कौन’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोहनीशने पत्रकार परिषदेत सलमानशी संबंधित एक रंजक किस्सा सांगितला होता. त्याने सांगितले की, जेव्हा तो आणि सलमान दोघेही करिअरमध्ये संघर्ष करत होते, तेव्हा ते दोघे एकत्र जिममध्ये जात असत. त्या काळात सलमान इतका कंजूष होता की तो जिमसाठी पैसेही देत नव्हता, मग मोहनीश त्याची फी भरायचा.
मोहनीश बहलने केवळ चित्रपटातच नाही तर टीव्ही मालिकांमध्येही आपल्या पात्रांनी लोकांची मने जिंकली आहेत. आपल्या अभिनयाच्या जादूने त्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. छोट्या पडद्यावर तो ‘संजीवनी’ आणि नंतर ‘दिल मिल गए’, दिल मिल गए अशा अनेक शोमध्ये दिसला. 2003 मध्ये त्यांना संजीवनी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीत मोहनीशने ‘राजा हिंदुस्तानी’, ‘कहो ना प्यार है’, ‘अस्तित्व’, ‘फोर्स’ आणि ‘जय हो’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्याने आजवर 100 हून अधिक चित्रपटांमध्ये आपले अभिनयाचा ठसा उमटवला आहे.