जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / कारकिर्दीत तब्बल 180 फ्लॉप चित्रपट देऊनही 'हा' अभिनेता ठरला सुपरस्टार; नाव ऐकून बसणार नाही विश्वास

कारकिर्दीत तब्बल 180 फ्लॉप चित्रपट देऊनही 'हा' अभिनेता ठरला सुपरस्टार; नाव ऐकून बसणार नाही विश्वास

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता

फ्लॉप चित्रपटांची संख्या जास्त असली तरी त्याला बॉलीवूडचा सुपरस्टार म्हटले जाते, कारण मिथुनचे स्टारडम इतर अभिनेत्यांपेक्षा थोडे वेगळे आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 जुलै :  बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता होता ज्याचे एक दोन नाही तर तब्बल 180 चित्रपट फ्लॉप झाले होते. त्याच्या हिट चित्रपटांपेक्षा फ्लॉप चित्रपटांचीच संख्या जास्त आहे. पण तरीही हा अभिनेता सुपरस्टार झाला होता. त्याचे जगभरात प्रचंड चाहते आजही आहेत. या सुपरस्टारच नाव आहे मिथुन चक्रवर्ती. त्याच्या फ्लॉप चित्रपटांची संख्या जास्त असली तरी त्याला बॉलीवूडचा सुपरस्टार म्हटले जाते, कारण मिथुनचे स्टारडम इतर अभिनेत्यांपेक्षा थोडे वेगळे आहे. मिथुन चक्रवर्ती हे एक ज्येष्ठ अभिनेते तसेच निर्माता आणि राजकारणी आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी आणि बंगाली भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते राज्यसभेचे माजी खासदारही आहेत. त्यांना तीनदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. पण एक काळ असा होता की मिथुन यांचे लागोपाठ चित्रपट सोशल मीडियावर फ्लॉप होत होते.

News18लोकमत
News18लोकमत

मिथुनने 1976 मृगया या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना  सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. 1982 मध्ये आलेल्या डिस्को डान्सर या चित्रपटात त्यांनी जिमीची भूमिका साकारली होती, जो जगभरात 100 कोटींचा गल्ला पार करणारा पहिला भारतीय चित्रपट होता. ‘डिस्को डान्सर’ व्यतिरिक्त चक्रवर्तीला सुरक्षा, साहस, वारदात, वाँटेड, बॉक्सर, प्यार झुकता नहीं, प्यारी बहना, अविनाश, डान्स डान्स, प्रेम प्रतिज्ञा, मुजरिम, अग्निपथ, युगंधर, द डॉन यांसारख्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखले गेले. ‘बाईपण भारी’ साठी कायपण! महिलांनी लढवली भन्नाट शक्कल; 100 जणींनी बसवारी करत गाठलं थिएटर मिथुन गेल्या 47 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय असून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये ते शेवटचे दिसले होते. मिथुनने आतापर्यंत बंगाली, हिंदी, उडिया, भोजपुरी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांसह 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे, परंतु DNA मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार मिथुनने त्याच्या करिअरमध्ये 180 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. मिथुन चक्रवर्ती हा असा बॉलिवूड स्टार आहे ज्याने आपल्या करिअरमध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत 180 फ्लॉप चित्रपटात काम केले आहे, ज्यामुळे त्याच्या अपयशाचे प्रमाण सुमारे 60% आहे. या फ्लॉप चित्रपटांमध्ये 47 चित्रपटांचा समावेश आहे जे बॉक्स ऑफिसवरील डिझास्टर या गटात सामील होतात.  पण तरीही मिथुन यांना स्टार मानले जाते. कारण या 180 फ्लॉप चित्रपटां सोबतच मिथुनने 50 हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. या यादीत त्याचा चौथा नंबर आहे. 1990 च्या दशकात, मिथुनने एकदा सलग फ्लॉप चित्रपटांचा विक्रमच केला. 1993 ते 1998 या काळात त्याचे सलग 33 चित्रपट  फ्लॉप झाले होते.

News18

अशा 180 चित्रपटांसह, मिथुन सर्वाधिक फ्लॉप असलेल्या बॉलिवूड अभिनेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर जितेंद्र 106 फ्लॉप चित्रपटांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. हे दोनच कलाकार आहेत ज्यांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक फ्लॉप ठरले. धर्मेंद्रचा देखील या यादीत समावेश असून त्यांनी आजवर आपल्या करिअरमध्ये 99 फ्लॉप चित्रपट दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात