जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'बाईपण भारी' साठी कायपण! महिलांनी लढवली भन्नाट शक्कल; 100 जणींनी बसवारी करत गाठलं थिएटर

'बाईपण भारी' साठी कायपण! महिलांनी लढवली भन्नाट शक्कल; 100 जणींनी बसवारी करत गाठलं थिएटर

बाईपण भारी देवा

बाईपण भारी देवा

विशेषतः महिला वर्गाचा ‘बाई पण भारी देवा’ या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच गावात थिएटर नसलेल्या एका ठिकाणी महिलांनी हा चित्रपट पाहण्याचा निश्चयच केला आणि त्यातून एक भन्नाट गोष्ट घडली.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

तुषार शेटे, मुंबई, 11 जुलै : केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाई पण भारी देवा’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तिकीट खिडकीवर या चित्रपटाने 12 कोटींचा टप्पा ओलांडलाय. राज्यातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये सिनेमा तिसऱ्या आठवड्यातही हाऊसफुल्ल आहे. नुकतंच समोर आलेल्या आकडेवारीनुसार या सिनेमानं २६ कोटींचा गल्ला जमावलाय. विशेषतः महिला वर्गाचा या सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशातच गावात थिएटर नसलेल्या एका ठिकाणी महिलांनी हा चित्रपट पाहण्याचा निश्चयच केला आणि त्यातून एक भन्नाट गोष्ट घडली. महाराष्ट्रात ज्या शहरांमध्ये मोठं थिएटर नाही किंवा आहे त्या सिंगलस्क्रिन थिएटरमध्ये बाई पण भारी देवा पिक्चर अद्याप लागलेला नाही. अशा ठिकाणाच्या महिलांनी पिक्चर पाहण्यासाठी धमाल पर्याय निवडलाय. पालघर जिल्ह्यातल्या वाडेगावात हा पिक्चर अद्यापही रिलीज झालेला नाही. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेमुळे पिक्चर पाहण्यासाठी इथल्या महिला कासावीस झाल्या होत्या. आपल्या पतीच्या मागे  त्यांनी पिक्चर पाहण्यासाठी तगादा लावला होता. मात्र ते काही शक्य होत नसल्याने या महिलांनी थेट मॉलमध्ये पिकनीक काढत पिक्चर पाहण्याचा निर्णय घेतला.

News18लोकमत
News18लोकमत

आधीच अस्तित्वात असलेल्या व्हॉट्सग्रुपमध्ये ही कल्पना फॉरवर्ड झाली. आणी पाहता पाहता 2 दिवसात 100 महिला पिक्चर पाहण्यासाठी तयार झाल्या. तिकीटं बुक झाल्यानंतर सगळ्यांना एकत्र आणि एकाच वेळी मॉलमध्ये पोहोचता यावं यासाठी 2 बसेस बुक करण्यात आला. पिकनीक किंबहुना बाईपण भारी देवा पिक्चर पाहण्याचा दिवस उजाडला. शूटिंगसाठी मनालीला गेला अन् पुरात अडकून बसला प्रसिद्ध अभिनेता; म्हणाला ‘घरी जाण्याचा रस्ता बंद…’ भल्या पहाटेपासून महिलांची तयारी सुरू होती. पिक्चर पाहायच्या आधीपासून अनेकींच्या मोबाईलच्या रिंगटोनमध्ये बाई पण भारी देवा वाजत होतं. ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये पोहोचल्या.  नंतर या महिलांनी त्यांचा दिवस त्यांच्या परिने फुल्ल एन्जॉय केला. पिक्चर सुरू असताना सुध्दा टायटल सॉंग जेव्हा सुरू झालं तेव्हाही या महिलांनी थिएटरमध्ये नाचायला सुरूवात केली.  पिक्चर संपल्यानंतर मॉलमध्येच झिम्मा आणि फुगड्या खेळल्या. बस मधून पुन्हा घरी जाताना गाण्यांच्या भेंड्या एवजी बाई पण भारी देवा गाणं बोलताना दिसल्या. यातल्या काही महिला तर अशा होत्या की त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा मॉलमध्ये पाय ठेवला असेल. “खरंच असे सिनेमे वारंवार यायला हवेत की जेणेकरून त्या निमित्ताने गावातील महिला वर्गाला मोकळा श्वास घेता येईल” अशी प्रतिक्रिया महिला मंडळातल्या श्रेया सोनटक्के यांनी व्यक्त केली.

News18

News18

इतक्या वर्षात विविध चित्रपटाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत खूप वेगवेगळे अनुभव आलेत. मात्र फक्त पिक्चर पाहाता यावा यासाठी आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळून, शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या महिलांच्या पिक्चर आणि कलाकारांच्या प्रेमामुळे खरंच भारावून गेलोय. हे संपूर्ण टीमवर्क असून खरं श्रेय कलाकारांचं असल्याची प्रतिक्रिया चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदेनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात