मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aishwarya Rai ची एकूण संपत्ती ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या तिचे महिन्याचे उत्पन्न किती?

Aishwarya Rai ची एकूण संपत्ती ऐकून थक्क व्हाल; जाणून घ्या तिचे महिन्याचे उत्पन्न किती?

aishwarya rai bachchan

aishwarya rai bachchan

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्‍चन (Aishwarya Rai Bachchan) हिची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. कारण ऐश्वर्या ही देशातीलच नाही तर जगभरातील हाय प्रोफाइल सेलिब्रिटीज बनली आहे.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर:  बॉलिवूडमधील सर्वात प्रभावी कुटुंब कोण आहे असे आपणास विचारले गेले तर कदाचित फक्त एक-दोन नावे समोर येतील. कपूर खानदानंतर आता फक्त बच्चन कुटुंब पुढे येईल. बॉलिवूड ( Bollywood ) इंडस्ट्री खूप मोठी आहे. बॉलिवूडमध्ये अनेकजण आपलं नशीब आजमावण्यासाठी येतात, व स्वतःच्या मेहनतीच्या बळावर यश देखील मिळवतात. मोठ्या बजेटचे ( big budgets ) चित्रपट केल्या जाणाऱ्या या बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी मेहनतीच्या बळावर यश मिळवत करोडो रुपयांची संपत्ती कमावली आहे.  या यादीत बॉलिवूडचं सौंदर्य अर्थात अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन (aishwarya rai bachchan) ही देखील आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या अभिनयाने आणि सौदर्याने केवळ देशातच नव्हे तर जगभरातील चाहत्यांची पसंती मिळवली आहे. ऐश्वर्या आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या कोट्यवधी संपत्तीविषयी...

ऐश्वर्या राय बच्चनने 1991 मध्ये मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा खिताब पटकावल्यानंतर ऐश्वर्या कायम चर्चेत आहे. ऐश्वर्याला भारत सरकारने देखील ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. इतकंच नाही तर सन 2012 मध्ये फ्रान्स सरकारने ऐश्वर्याला ‘ऑर्ड्रे डेस आर्ट्स एट डेस लेट्रेस’नं पुरस्कृत केलं होतं

ऐश्वर्याने 1997 मध्ये मणिरत्नम दिग्दर्शित तमिळ चित्रपट इरुवर ( Iruvar ) मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिला पहिल्याच चित्रपटात यश मिळाले. यानंतर 1998 मध्ये 'और प्यार हो गया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये तिने पदार्पण केले. ऐश्वर्याने आपल्या सौंदर्यानेच नव्हे तर अभिनयानेही सर्वांची मने जिंकली. करिअरमध्ये एका पेक्षा एक जबरदस्त चित्रपटांमध्ये काम करणारी ऐश्वर्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे, आणि याच कारणामुळे तिची कमाई देखील करोडोच्या घरात आहे. 2004 मध्ये ऐश्वर्याने तिचे फाउंडेशन सुरू केले. या फाउंडेशनच्या माध्यमातून ती गरजू लोकांना मदत करते. तसेच ऐश्वर्या सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे.

caknowledge.com च्या रिपोर्टनुसार, ऐश्वर्याची एकूण संपत्ती 227 कोटी आहे. तर, तिचे महिन्याचे उत्पन्न 1 कोटींहून अधिक आहे. एका वर्षात 12 कोटींपेक्षा जास्त पैसे ऐश्वर्या कमवते. ऐश्वर्या सध्या पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत मुंबईत एका आलिशान घरात राहत आहे. याशिवाय ऐश्वर्याकडे 2 घरे आहेत, त्यापैकी एक मुंबईत आहे आणि दुसरे दुबईत आहे. ऐश्वर्याचे दुबईतील घर खूपच आलिशान आहे आणि त्याची बरीच चर्चा झाली आहे. ऐश्वर्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. ज्यामध्ये मर्सिडीज बेंझ, ऑडी आणि एक मिनी कूपर यांचा समावेश आहे.

ऐश्वर्या चित्रपटांमधून जवळपास 6 कोटी कमावते. ब्रँड एंडोर्समेंटसाठी ती 7 कोटी रुपयांपर्यंत पैसे घेते. ऐश्वर्याची वैयक्तिक गुंतवणूक 182 कोटी आहे. गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास ऐश्वर्याची कमाई वाढतच चालली आहे. ऐश्वर्याने 2017 मध्ये 9 कोटी, 2018 मध्ये 7 कोटी, 2019 मध्ये 11 कोटी आणि 2020 मध्ये 13 कोटी कमावले आहेत.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फन्ने खान' या चित्रपटात ऐश्वर्या रायने काम केले होते. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षात ती चित्रपटांमध्ये दिसली नाही. मात्र, लवकरच ऐश्वर्या ‘पोन्नियन सेलवन’ (Ponniyin Selvan) या चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच दिवसानंतर ऐश्वर्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

एकेकाळची मिस वर्ल्ड म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली होती. तिने पुढे अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांची जोडी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांना आराध्या नावाची मुलगी आहे.

First published:

Tags: Abhishek Bachchan, Aishwarya rai, Amitabh Bachchan, Entertainment