मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

B'day Special: या कारणामुळे केला आत्महत्येचा विचार, एका निर्णयाने बदललं Ileana D'Cruz चं आयुष्य

B'day Special: या कारणामुळे केला आत्महत्येचा विचार, एका निर्णयाने बदललं Ileana D'Cruz चं आयुष्य

1 नोव्हेंबर 1987 रोजी मुंबईत इलियानाचा जन्म झाला. तिचे वडील रोनाल्डो डिक्रूझ हे पोर्तुगीज कॅथलिक आहेत, तर आई मुस्लिम आहे. आज ती आपला 34 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे.

1 नोव्हेंबर 1987 रोजी मुंबईत इलियानाचा जन्म झाला. तिचे वडील रोनाल्डो डिक्रूझ हे पोर्तुगीज कॅथलिक आहेत, तर आई मुस्लिम आहे. आज ती आपला 34 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे.

1 नोव्हेंबर 1987 रोजी मुंबईत इलियानाचा जन्म झाला. तिचे वडील रोनाल्डो डिक्रूझ हे पोर्तुगीज कॅथलिक आहेत, तर आई मुस्लिम आहे. आज ती आपला 34 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे.

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : रुस्तुम चित्रपटामधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी इलियाना डिक्रूज (ileana D'druz) गेल्या काही काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र लवकरच ती एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फिटनेसमुळे, सोशल मीडियावरील अनेक फोटोजमुळे इलियाना सतत चर्चेत असते. आज ती आपला 34 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. 1 नोव्हेंबर 1987 रोजी मुंबईत इलियानाचा जन्म झाला. तिचे वडील रोनाल्डो डिक्रूझ हे पोर्तुगीज कॅथलिक आहेत, तर आई मुस्लिम आहे. ती दहा वर्षांची असताना तिचं संपूर्ण कुटुंब गोव्यात (Goa) स्थलांतरित झालं. 2014 मध्ये तिने पोर्तुगालचं (Portugal) नागरिकत्वही घेतलं आहे. 2003 मध्ये, ग्लॅमरच्या जगात प्रवेश करण्यासाठी तिचे पहिलं फोटोशूट केलं, मात्र ते अजिबात चांगलं झालं नव्हतं. मग तिने पुन्हा पोर्टफोलिओ बनवला. त्यानंतर हळूहळू तिला जाहिरातींमध्ये काम मिळू लागलं. करिअरच्या सुरुवातीला चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनी तिला खूप सपोर्ट केला. इलियाना डिक्रूझने 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'बर्फी' चित्रपटातून (Burfi) बॉलिवूडमध्ये (Bollywood)पदार्पण केलं. या चित्रपटात रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा होते. त्याआधी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत (South Film Indusrty) तिनं चांगली काम केलं होतं. तिने पहिल्यांदा 'देवदासू' या तेलुगू चित्रपटात काम केलं होतं. 2006 मध्ये 'आरती' चित्रपटाद्वारे तिने तमिळमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने साऊथमध्ये 18 चित्रपट केले होते, त्यात सर्वाधिक तेलुगू चित्रपट होते.

HBD Aishwarya Rai : ऐश्वर्या कशी झाली बच्चन घराण्याची सून; वाचा रंजक Love Story

'बर्फी' चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं. त्यानंतर 'फटा पोस्टर निकला हीरो', 'मैं तेरा हिरो', 'हॅपी एंडिंग', 'रुस्तम', 'रेड', 'बादशाहो', 'मुबारकां', 'द बिग बुल' असे अनेक चित्रपट तिनं केले. रुस्तुममधील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झालं. इलियाना आज अत्यंत यशस्वी अभिनेत्री असली तरी एक काळ असा होता जेव्हा लोक तिच्या शरीरयष्टीमुळे तिची चेष्टा करत. त्यामुळे इलियाना खूप नाराज व्हायची. नंतर तिला 'डिस्मॉर्फिक डिसऑर्डर' (Dysmorphic Disorder) हा आजार असल्याचं कळलं. यामध्ये कंबरेचा खालचा भाग वाढतो. यामुळे ती डिप्रेशनमध्येही गेली. त्यातून तिनं आत्महत्येचा (Suicide) निर्णयही घेतला होता. मात्र घरच्यांचा पाठिंबा आणि प्रेम यामुळे ती सावरली आणि तिनं स्वतःला आत्महत्येच्या निर्णयापासून परावृत्त केलं.

NCB ला दिलेले वचन Aryan Khan ने पाळले? २४ तासांत उचललं मोठं पाउल

यानंतर तिनं अगदी आत्मविश्वासाने स्वतःला संघर्षासाठी सिद्ध केलं आणि सकारात्मक विचार करत स्वतःला या आजारातून, निराश मानसिकतेतून बाहेर काढलं आणि चित्रपटात आपलं यशस्वी करिअर घडवलं. आता ती नेहमी लोकांना सांगते की, तुम्ही कसेही दिसा, तुम्ही सर्वोत्तम आहात. तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर इतरांकडून अपेक्षा करू नका. लवकरच इलियाना 'तेरा क्या होगा लवली' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Bollywood actress

पुढील बातम्या