जिम ट्रेनर कतरिनाने आलियाला दिले व्यायामाचे धडे, पाहा हा VIDEO

जिम ट्रेनर कतरिनाने आलियाला दिले व्यायामाचे धडे, पाहा हा VIDEO

कतरिना सौदर्याबरोबरच व्यायामासाठी ओळखली जाते. ती कधीच आपला व्यायाम चुकवत नसल्याचे अनेक कलाकारांचे म्हणणे आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina Kaif) फिटनेस आपल्याला माहितच आहे. कोरोनामुळे जिम बंद करण्यात आली असली तरी कॅट तिचा व्यायाम कधीच चुकवत नाही. तिच्या सौंदर्याबरोबर तिच्या फिटनेसवर चाहते फिदा आहेत. दरम्यान, कतरिना कैफचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आलिया भट्टही ( Alia Bhatt) दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कतरिना कैफ जिममध्ये आलिया भट्टला ट्रेनिंग देताना दिसत आहे. हा व्हिडीओ वुम्प्लाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तीन दिवसांपूर्वी हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओत कतरीना कैफ आलियाला ट्रेनिंग देत आहे.

हे वाचा - शशांक केतकरनं घेतली ‘पिशवीवाल्या’ आजोबांची भेट, शेअर केली माहीत नसलेली गोष्ट

आलिया व्यायाम करुन दमली आहे. मात्र तरीही अधिक व्यायाम करण्यासाठी कतरिना तिला प्रोत्साहन देत आहे. यापूर्वी कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्या घराच्या छतावर व्यायाम करीत होत्या. कतरिनाने या व्हिडीओसोबत लिहिले आहे की, घरातच वर्कआऊट. जिमला जाऊ शकत नाही म्हणून वर्कआऊट व्हिडीओ शेअर करीत आहे. हे व्यायाम आपण घरात करु शकतो आणि Active राहू शकतो.

कतरिना आगामी 'सुर्यवंशी' या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत दिसणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या चित्रपदाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.  तर दुसरीकडे आलिय भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोडी पहिल्यांदाचा एकत्र चित्रपटात दिसणार आहे. हे दोघेही 'ब्रम्हास्त्र' या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट 20 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत महानायक अमिकाभ बच्चनही स्क्रिन शेअर करणार आहेत. याशिवाय आलिया गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातही मुख्य भूमिकेत आहे.

हे वाचा - अश्लील गाण्यात घेतलं महात्मा गांधीजींचं नाव, अभिनेत्री विरोधात FIR दाखल

First published: March 19, 2020, 7:25 AM IST

ताज्या बातम्या