मुंबई, 04 नोव्हेंबर: ‘फिटनेस फ्रिक’, ‘आयर्न मॅन’ नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमणचा (Milind Soman Birthday) आज वाढदिवस आहे. चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. मात्र मागील वर्षी त्याने वाढदिवसाच्यानिमित्त सोशल मीडियावर एक न्यूड फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे तो चांगलाचा चर्चेत आला होता व त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
मॉडेलिंगपासून अभिनयापर्यंतच्या करिअरमध्ये मिलिंदला अनेकवेळा वादविवादालाही सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे काही वेळा तो ट्रोलदेखील होत असतो. या फोटोच्या बाबतीतही तसाच प्रकार त्याच्याबाबतीत घडला होता.
मिलिंदने 2020 मध्ये त्याच्या वाढदिवशावेळी इन्स्टाग्रामवर एक न्यूड फोटो शेअर केला होता. यात तो बीचवर धावताना दिसत होता. त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट्स करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे यापूर्वी देखील त्याने असाच एक न्यूड फोटो शेअर केला होता. यामुळे देखील त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
वाचा :'56'चा फिटनेस फ्रीक तरुण! अभिनयच नव्हे तर केलीय आंतरराष्ट्रीय कामगिरी
न्यूड फोटो शेअर करत मिलिंदने म्हटले होते की, भारतीय परंपरेच्या दृष्टीने हा फोटो मला काहीच चुकीचा वाटत नाही. भारताची संस्कृती, परंपरा महान आणि विविधतेने नटलेली आहे. तसेच तो असा देखील म्हणाला की, मी विविध देशाची यात्रा केली. या प्रवासात मी अनेक लोकांशी जोडलो गेलो. तिथली संस्कृती जाणून घेता आली. त्याचा हा फोटो पत्नी काढला असल्याचे त्याने सांगितलं होतं.
काही लोकांनी या फोटोची प्रशंसा देखील केल्याचे मिलिंदने सांगितले होते. खूप चांगल करत आहे आणि संस्कृतीशी जोडलं जाणार आहे. मात्र काही लोक मला यावरून अमेरिकेची संस्कृती फॉलो करत असल्याचे म्हटलं आहे. मात्र अमेरिकेत असं निर्वस्त्र फिरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाते . उलट भारतात याबद्दल असा कोणताच कायदा आहे. हे मजर कायद्यात बसलं नसतं तर इन्स्टावालानी माझ्यावर कारवाई केली असते.
वाचा : 10 महिन्याच्या लेकीला मिळालेल्या रेपच्या धमकीवर अनुष्काची प्रतिक्रिया..
असा हा फिटनेस फ्रिक अभिनेता सोशल मीडियावर त्याच्या फिटनेसमुळे व फोटोमुळे नेहमीच चर्चेत असतो. 56 वर्षाच्या मिलिंदचा फिटनेस तरूणाईला लाजवेल असाच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Milind soman