मुंबई, 04 नोव्हेंबर: बॉलिवू़ड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Shrama) आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohali) मुलीला सोशल मीडियावरून बलात्काराच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आता दिल्ली महिला आयोगाने लक्ष घातले आहे. अनुष्काच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, यावर आता अनुष्काने प्रतिक्रिया दिली आहे. टी-20 विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तानकडून पराभव झाला तेव्हा विराटला ही धमकी ट्विटरवरून देण्यात आली होती. विराटने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बाजू घेतली होती. त्यानंतर असा धक्कादायक प्रकार घडला होता. आता या सर्व प्रकारावर अनुष्काने प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आली आहे. वाचा : रजनीकांत यांचा Annaatthe रिलीज, फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी उसळली चाहत्यांची गर्दी अनुष्काच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून एका आईप्रमाणे ती या सर्व प्रकराणानंतर तिचं मन दुखी झालं आहे. सोबतच या सर्व प्रकरणाबद्दल तिच्या मनात चिड देखील निर्माण झाली आहे. BollywoodLife.com ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सेलेब्स म्हणून अशा ट्रोलिंगापसून खबरदारी म्हणून तिनं स्व:ता भोवती एक भिंत तयार केली आहे. ती अशाप्रकारपासून लांब राहणं पसंद करते. अशा प्रकारावर ती कधीच व्यक्त होताना दिसत आहे. जरी विराट आणि अनुष्का सोशल मीडियावर सक्रीय असले तर दोघेही अशा प्रकारात शांत राहताना दिसतात. मात्र यावेळी गोष्ट त्यांच्या मुलीची आहे. त्यामुळे या प्रकरणामुळे ती दुखी झाली आहे. मनातून तिला चिड देखील निर्माण झाली आहे. वाचा : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ पुन्हा ट्रॅक बदलला; VIDEO पाहून प्रेक्षक खूश सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुष्काच्या बाबतीत शक्यता जास्त आहे की ती हा प्रकार थांबवण्यासाठी आता नेहमीसारखा सोशल मीडियाचा वापर करताना दिसणार नाही. तिला राग आला आहे. मात्र हे सगळं थांबवण्यासाठी काही काळासाठी सोशल मीडियाचा वापर करणार नाही. मात्र सर्व शांत झाल्यानंतर ती पुन्हा सोशल मीडियाचा वापर करतावा दिसेल.सध्या सणाचे दिवस आहेत. त्यामुळे अशा वाईट प्रकारामुळे तिला तिचे चांगले दिवस खऱाब करायचे नाहीत अशी माहिती समोर आलेली आहे. आधी आयपीएलमध्ये चांगले न खेळल्याबद्दल धोनीच्या मुलीवर आणि आता टी-२० वर्ल्ड कपमध्ये चांगले न खेळल्याबद्दल विराटच्या मुलीला अशा धमक्याचा सामाना करावा लागत आहे.दिल्ली महिला आयोगाने मंगळवारी (२ नोव्हेंबर) दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी नोटीस पाठवली आहे . सांगितले आहे की, मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या मुलीला दिलेल्या धमक्यांची आयोगाने स्वत:हून दखल घेतली आहे. सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यात संघाचा पराभव झाल्यापासून विराट कोहलीच्या दहा महिन्यांच्या मुलीवर बलात्कार करण्याच्या ऑनलाइन धमक्या दिल्या जात असल्याचेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.