मुंबई, 04 नोव्हेंबर: मराठमोळा बॉलिवूड अभिनेता, सुपर मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) 4 नोव्हेंबरला 56 वर्षाचा झाला आहे. मात्र वय 56 वर्षाचं होऊनही मिलिंदचा फिटनेस तरूण पोरांना लाजवेल असा आहे. मिलिंदाचा जन्म स्कॉटलॅंडमध्ये झाला आहे. मिलिंदचे वडील प्रभाकर सोमण (Prabhakar Soman) वैज्ञानिक होते. तर आई उषा सोमण या शिक्षिका होत्या. मुलासारखाच त्याच्या आईचा देखील फिटनेस सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. मिलिंद त्याच्या नावासोबत आईचे नाव (Milind Usha Soman )लावतो.
मिलिंद सोमणने त्याचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच घतले आहे. अँटोनियो डी सिल्वा पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर साबो सिद्दीकी कॉलेजमधून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पण त्याने ग्लॅमरच्या दुनियेत आपलं करिअर करायचं ठरवलं होतं. सुरुवातीला त्याने मॉडेलिंग केली यातूनच त्याला सुपर मॉडेल ही ओळख मिळाली. 1995 मध्ये, तो पहिल्यांदा पॉप गायिका अलीशा चिनॉयच्या 'मेड इन इंडिया' व्हिडीओ अल्बममध्ये दिसला. हा व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला.
View this post on Instagram
मिलिंद सोमण यांनी 2000 साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2000 साली त्याचा 'तर्कीब' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये त्याने कॅप्टन अजित वर्माची भूमिका केली होती. '16 डिसेंबर' 2002 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यानंतर त्याने 'अग्नी वर्षा', 'अशोका', 'सूर्या', 'जुर्म', 'भेजा फ्राय', 'भ्रम', 'डेव्हिड' आणि 'बाजीराव मस्तानी' असे अनेक हिंदी चित्रपट केले. बॉलीवूड चित्रपटांव्यतिरिक्त, मिलिंदने मराठी, तमिळ आणि तेलगू भाषेतील चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
वाचा : 'येऊ कशी तशी मी नांदायला' पुन्हा ट्रॅक बदलला; VIDEO पाहून प्रेक्षक खूश
मिलिंदला लहानपणापासूनच फिटनेसची खूप आवड आहे. वयाच्या 6 व्या वर्षीच त्याने पोहायला सुरुवात केली. मिलिंद हा राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूही आहे. 1984 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने रौप्य पदक जिंकले आहे.
त्याच्या फिटनेसबद्दल, तो एका मुलाखतीत म्हणाला होता की, “मी एका वेळी 30 सेकंद ते 3 मिनिटामध्ये मायक्रो वर्कआउट करतो. मी दररोज सुमारे 15 ते 20 मिनिटे व्यायाम करतो. मी एका मिनिटात 60 पुशअप आणि रोज 30 सूर्यनमस्कार करतो. तसेच तो शालेय जीवनापासून एका आठवड्यात जवळजवळ 65 किलोमीटर पोहतो.
वाचा : 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ
अभिनेता मिलिंद सोमणच्या नावावरही लिम्का रेकॉर्ड आहे, ज्यामध्ये त्याने 30 दिवसांत 1500 किलोमीटर धावण्याचा विक्रम केला होता. 2015 मध्ये मिलिंदने पहिल्याच प्रयत्नात 15 तास 19 मिनिटांत आयर्नमॅन चॅलेंज पूर्ण केले आहे.
अशा या ‘फिटनेस फ्रिक’, ‘आयर्न मॅन’ नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता व मॉडेल मिलिंद सोमणचा आज वाढदिवस आहे. चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Milind soman