मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Milind Soman : प्रेमात 100 फूट खोल 'बुडाले' मिलिंद-अंकिता; अंडर वॉटर रोमान्सचा VIDEO VIRAL

Milind Soman : प्रेमात 100 फूट खोल 'बुडाले' मिलिंद-अंकिता; अंडर वॉटर रोमान्सचा VIDEO VIRAL

मिलिंद आणि अंकिताचा हा रोमँटिक अंदाज बराच लक्षवेधी ठरताना दिसत आहे.

मिलिंद आणि अंकिताचा हा रोमँटिक अंदाज बराच लक्षवेधी ठरताना दिसत आहे.

मिलिंद आणि अंकिताचा हा रोमँटिक अंदाज बराच लक्षवेधी ठरताना दिसत आहे.

  • Published by:  Rasika Nanal
मुंबई 27 जुलै: प्रत्येक भारतीय मुलीचा मॅन क्रश असलेला मिलिंद सोमण हा अभिनेता नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या अफाट फिटनेससह हा अभिनेता त्याच्या क्युट रोमँटिक अंदाजासाठी सुद्धा बराच ओळखला जातो. मिलिंद हा पत्नी अंकिता कोंवरसोबतच्या अनेक आठवणी आणि अपडेट सोशल मीडियावर शेअर करत असतो.मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता यांचा एक नवा व्हिडिओ सध्या चाहत्यांचा लक्ष वेधून घेताना दिसत आहे. मिलिंदचा रोमँटिक अंदाज वाढतोय लक्ष या नव्या व्हिडिओमध्ये अंकिता आणि मिलिंद अंडर वॉटर रोमान्स करताना दिसत आहेत. दोघेही एकत्र स्कुबा डायविंग करताना दिसत असून पाण्याखाली त्यांचं प्रेम उतू गेल्याच दिसून येत आहे. हा खास व्हिडिओ मिलिंदने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे, “एकत्र जास्तीत जास्त एक्स्प्लोर करा”
जमिनीपेक्षा शंभर फीट खाली सुद्धा दाखवलेलं त्यांचं हे प्रेम लक्षवेधी ठरत आहे. मिलिंद अंकिता हे कायमच त्यांचे कपल गोल्स दाखवताना दिसून येतात. मिलिंद इतकीच अंकिता सुद्धा फिटनेसबद्दल जागरूक असल्याने दोघे नेहमीच एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. तसंच दोघांवर असलेलं प्रेम सुद्धा अगदी दिलखुलासपणे व्यक्त करताना दिसत असतात. त्यांचे अनेक क्युट फोटो सुद्धा आजवर viral झाले आहेत. फिल्म इंडस्ट्रीचं एक लाडकं कपल म्हणून त्यांना ओळखलं जातं. हे ही वाचा- Cosmetics surgery bollywood: कतरिना ते प्रियांका 'या' आघाडीच्या अभिनेत्रींनी स्वीकारला कॉस्मेटिक सर्जरीचा मार्ग त्यांच्या या व्हिडिओला सुद्धा चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मिलिंदचा चाहतावर्ग तास बराच मोठा आहे पण या खास व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसत आहे. अंकितावर असलेलं प्रेम व्यक्त करायची मिलिंद एकही संधी सोडत नाहीत. त्यांच्यात वयाचं बरंच अंतर असलं तरी त्यांचं एकमेकांवर असलेलं निस्सीम प्रेम नेहमीच दिसून आलं आहे. हा नवा व्हिडिओ सुद्धा त्यांच्या प्रेमाची साक्ष देताना दिसत आहे.
First published:

Tags: Bollywood News, Cute couple, Milind soman

पुढील बातम्या