बॉलिवूड आणि कॉस्मेटिक सर्जरी यांचं नातं बरंच जुनं आहे. एवढंच नव्हे तर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी स्वतःचं रूप बदलण्यासाठी सर्जरी केल्याचं कबुलसुद्धा केलं आहे.
प्रियांका चोप्रा या अभिनेत्रीच्या सौंदर्यावर तर अनेकजण फिदा आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार प्रियंकाने स्वतःच्या नाकावर सर्जरी करून घेतल्याचं समोर आलं आहे. तसंच ही गोष्ट तिने स्वतः मेनी केल्याचं सुद्धा सांगितलं जातं.
येत्या काळात छकडा एक्स्प्रेस सिनेमातून समोर येणारी अभिनेत्री अभिनेत्री अनुष्का शर्माने सुद्धा लीप एन्हान्समेंट सर्जरी केल्याचं समोर येत आहे. सोशल मीडियावरील अनेक वादविवादानंतर तिने एका मुलाखतीत याबद्दल खुलासा करत तात्पुरती सर्जरी केल्याचं स्पष्ट केलं होतं.
बॉलिवूडची कॅट म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफने सुद्धा सुंदरता वाढवण्यासाठी स्वतःच्या गालांवर आणि ओठांवर सर्जरी करून घेतल्याचा अंदाज वर्तवला जातो. यावर कतरिनाने अजून कोणतीच पुष्टी दिलेली नाही.
अभिनेत्री श्रुती हसन हिने सुद्धा मागच्या वर्षी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सर्जरी केल्याची गोष्ट स्वीकारली होती. अंडर द नाईफ सर्जरी करून तिने रूप अधिक देखणं केल्याचं सांगण्यात येतं.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या रूपावर आजही अनेक जण घायाळ आहेत. तिला आज तिच्या सुंदर रूपाची आणि फिटनेससाठी ओळखलं जातं. शिल्पाने सुद्धा नाकावर सर्जरी करून घेतल्याची बाब स्वीकार केल्याचं समोर येत आहे.
या अन त्या कारणांनी सतत चर्चेत असणारी अभिनेत्री राखी सावंतने सुद्धा तिच्या शरीरावर अनेक प्रकारच्या सर्जरी करून घेतल्या आहेत. राखीने ओठ, स्तन याव्यतिरिक्त अनेक भागांची सर्जरी करून घेतली आहे. याचा तिच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचं सुद्धा समोर आलं होतं.