मुंबई, 08 ऑक्टोबर : मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोनवार नेहमीच त्यांच्या फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर केल्यानं चर्चेत असतात. सध्या ही जोडी एका रोमँटिक व्हेकेशनवर आहे. मिलिंद आणि अंकिता मनाली ते लेह पर्यंत रोड ट्रिपवर निघाले आहेत आणि त्यांना त्यांच्या या व्हेकेशनचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात मिलिंद आणि अंकिता एकमेकांना किस करताना दिसत आहेत. मिलिंद आणि अंकिता सध्या लडाखमध्ये रोमँटिक ट्रिप एंंजॉय करत आहेत आणि मिलिंदनं या ट्रिपचा एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो पत्नी अंकितासोबत डान्स करता करता तिला किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये मिलिंदनं लिहिलं, रोहतांग लामध्ये फन टाइम. मनाली ते लेह पर्यंत उंचावर जाऊन उड्या मारण्यामध्ये तोपर्यंत काहीच मजा नाही जो पर्यंत तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ती व्यक्ती तुमच्या सोबत नाही. या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला एक मजेशीर पहाडी गाणं ऐकू येत आहे. राखी सावंतनं खरंच केलं लग्न! वाचा तिच्या पतीचा पहिला INTERVIEW
वयाच्या 53 व्या वर्षी मिलिंदचा फिटनेस अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. व्हेकेशन असो वा घर मिलिंद कधीच वर्कआउट करणं विसरत नाही. अंकिता सुद्धा मिलिंदच्या फिटनेसमध्ये त्याची पूर्ण साथ देते. मिलिंद आणि अंकिताच्या वयात 26 वर्षांचं अंतर आहे. मात्र या दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री आणि कनेक्शन पाहायला मिळतं. या दोघांना त्यांच्या वयातील अंतरामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आलं मात्र या दोघांनी नेहमीच एकमेकांना पाठिंबा दिला. वडिलांनी सोडली साथ, मोठ्या भावाचं निधन, KBC स्पर्धकाची कहाणी ऐकून बिग बी भावुक
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अंकिता म्हणाली, तुम्ही समाज काय म्हणेल असा विचार करत बसाल तर आनंदी कधीच राहू शकणार नाही. ज्या व्यक्तीसोबत तुम्ही तुमच लाइफ शेअर करणार आहात त्याच्यासाठी बाकी सर्व आनंदी आहेत मात्र तुम्ही खूप नसाल तर मग अशा नात्याला अर्थच काय. वय म्हणजे फक्त आकडे आहेत. वयापेक्षा प्रेम माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आणि मी मिलिंदसोबत खूप खूश आहे. त्यामुळे लोक काय बोलतात याकडे मी कधीच लक्ष देत नाही. या ‘विश्वसुंदरी’ अभिनेत्रीला मारायचा पती; 10 वर्षं आहे चित्रपटसृष्टीतून गायब =================================================================== VIDEO : अंगावर रोमांच उभी करणारी तलवारबाजीची थरारक प्रात्याक्षिकं