Home /News /entertainment /

SSR Death Case : 'CBI आणि एम्स एकमेकांशी सहमत मात्र आणखी चर्चेची आवश्यकता', मेडिकल बोर्डाच्या अध्यक्षांचे निवेदन

SSR Death Case : 'CBI आणि एम्स एकमेकांशी सहमत मात्र आणखी चर्चेची आवश्यकता', मेडिकल बोर्डाच्या अध्यक्षांचे निवेदन

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) कोणत्याही पैलूकडे दूर्लक्ष करण्यात आलेले नाही, असे सीबीआयचे (CBI) स्टेटमेंट आल्यानंतर एम्सने (AIIMS) देखील निवेदन जारी केले आहे.

    मुंबई, 29 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर  (Sushant Singh Rajput Death Case) मृत्यूनंतर या प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय आणि एनसीबी कडून केला जात आहे. या प्रकरणात बॉलिवूडमधील  ड्रग कनेक्शन समोर आले आहे. त्यानंतर तपासाची दिशा बदलली. मात्र अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याबाबत तपास सुरूच आहे. याप्रकरणात एम्सच्या फॉरेन्सिक टीमकडून अधिक तपास करण्यात येत आहे. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाने सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात एक निवेदन अध्यक्ष डॉ. सुधीर गुप्ता यांच्यामार्फत जारी केले आहे. मुंबईतील वांद्रे येथील सुशांत त्याच्या निवासस्थानी 14 जून रोजी मृतावस्थेत आढळून आला होता. एम्सच्या तज्ज्ञांची टीम व्हिसेरा चाचणीच्या निकालांवर आणि क्राईम सीन रिक्रेएशनच्या आधारे केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI)कडे त्यांचा अहवाल सादर करणार आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यूच्या घटनेबाबत आणखी चर्चा आवश्यक असल्याचे मत मेडिकल बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले आहे. (हे वाचा-श्रद्धा, दीपिका, साराच्या अडचणीत वाढ; मोबाइलसह 'या' गोष्टीतून सत्य उलगडणार) एम्सच्या मेडिकल बोर्डाचे अध्यक्ष डॉ. सुधीर असे म्हणाले की, 'सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एम्स आणि सीबीआय सहमत आहेत परंतु अधिक विचारविनिमय करण्याची गरज आहे. तर्कशुद्ध कायदेशीर निष्कर्षासाठी काही कायदेशीर बाबी तपासण्याची गरज आहे.' सुशांतच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी सीबीआय पथक एम्स मेडिकल बोर्डाबरोबर एक बैठक आयोजित करण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये ही बैठक होईल. 19 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे हे प्रकरण सुपूर्द केले होते. 22 ऑगस्टपासून त्यांनी याबाबत विविध पुरावे गोळा करण्यास, चौकशी करण्यास सुरुवात केली. सोमवारी सीबीआयने याप्रकरणात सुरू असलेल्या तपासाबाबत एक निवेदन जारी केले होते. (हे वाचा-ड्रग्स घेणाऱ्या सेलिब्रिटींची उडणार झोप, NCB ने जप्त केली तब्बल 45 मोबाइल फोन) सीबीआयने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, 'सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात एक प्रोफेशनल तपास सुरू आहे. याप्रकरणात सर्व पैलू तपासण्यात येत आहेत. आतापर्यंत एकाही पैलूकडे दुर्लक्ष केलेले नाही.' (हे वाचा-BMC ला फटकारलं! कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट) सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि एनफोर्समेंट डिरेक्टोरेट (ED) देखील वेगळ्या अँगलने तपास करत आहे. एनसीबी कडून याप्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचा देखील समावेश आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: CBI, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या