BMC ला कोर्टाने फटकारलं! कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट?

BMC ला कोर्टाने फटकारलं! कंगनाचं ऑफिस पाडायचे आदेश कोणी दिले, कोर्टात होणार स्पष्ट?

'अजून सिस्टीममध्ये अपलोड व्हायचाय!' कंगनाचं ऑफिस पाडल्याचा रिपोर्ट आहे का, यावर BMC ने कोर्टाला दिलं हे उत्तर. मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीत आज नेमकं काय घडलं वाचा सविस्तर

  • Share this:

हर्मन गोम्स

मुंबई, 28 सप्टेंबर : ऑफिसचं बांधकाम अनधिकृत आहे हे कधी लक्षात आलं, बांधकाम पाडल्याचे फोटो आहेत का, ते कोणी काढलेत, तुमच्याकडे या बांधकामाविरोधात कारवाई केल्याचा रिपोर्ट आहे का... अशा प्रश्नांची सरबत्ती कोर्टाने मुंबई महापालिकेला केली.  त्यावर 'रिपोर्ट अजून सिस्टीममध्ये अपलोड व्हायचाय!' असं उत्तर BMC ने दिलं. कोर्टाने याबाबत आश्चर्य व्यक्त करत महापालिकेला फटकारलं आहे.  कंगना रणौत विरुद्ध मुंबई महापालिका (BMC) यांच्या कोर्टापर्यंत गेलेल्या वादात BMC ला नेमका कुणी दिला हे कोर्टात स्पष्ट होणार का हे उद्या कळेल. कारण कोर्टाने मंगळवारी पुढची सुनावणी ठेवली आहे.

कंगनाच्या ऑफिसचं अनिधिकृत बांधताम महापालिकेनं 24 तासांच्या नोटिशीवर पाडलं, त्याविरोधातल्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. कंगना विरुद्ध BMC या वादामध्ये आज दिवसभरात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या कथित 'हरामखोर'  वक्तव्याचीही शहानिशा झाली. आता कंगनाचं ऑफिस पाडायचा आदेश नेमका कुणी दिला हेही स्पष्ट होऊ शकतं.  कोर्टाच्या सुनावणीदरम्यान वादग्रस्त शब्द 'हरामखोर'चा उल्लेख करण्यात आला. यावर कोर्टाने संजय राऊन यांनी हा शब्द का वापरला याचं उत्तर द्यावं लागेल, असं सांगितलं आहे.

महापालिकेची कारवाई संशयास्पद वाटते, असा शेरा कोर्टाने दिला आहे. तत्पूर्वी कोर्टात सुनावणीदरम्यान नेमकं काय झालं हे वाचा...

कोर्टाने विचारलं - "या कारवाईचे फोटो आहेत का? त्यावर तारीख आणि वेळ का नाही? 8 तारखेलाच ही कारवाई झाली हे कोर्टाला कसं समजणार?"

त्यावर महापालिकेच्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं - त्यासंबंधीची नोट 12 नंबरच्या पानावर आहे.

कोर्टाने पुन्हा एकदा या उत्तरावर BMC ला फटकारलं. "ही नोट तुम्ही कधीही लिहू शकता. 5 तारखेला कारवाई झाली त्याचा पंचनामा झाला की नाही?" त्यावर BMC ने पंचनामा झाला नाही. फक्त इन्स्पेक्शन रिपोर्ट दाखल करण्यात आला, असं उत्तर दिलं.

हे फोटो कुणी घेतले असं विचारल्यावर फील्ड ऑफिसरने घेतल्याचं उत्तर देण्यात आलं आणि संबंधित अधिकारी कोर्टात हजर नव्हता. तो उपनगरीय कार्यालयात असल्याचं सांगण्यात आलं.

कोर्ट - तुमच्याकडे बांधकाम पाडल्याचा काही रिपोर्ट आहे का?

महापालिका- नाही. तो अजून सिस्टीममध्ये अजून अपलोड झालेला नाही.

कोर्ट - 8 तारखेला बांधकाम पाडल्याचा रिपोर्ट सिस्टीममध्ये कसा नाही? का आता आम्ही विचारल्यावर तो तयार करून फाईल केला जातोय का? यामध्ये काहीतरी संशयास्पद आहे.

या सुनावणीदरम्यान वादग्रस्त शब्द 'हरामखोर'चा उल्लेख करण्यात आला. यावर कोर्टाने सांगितलं की, शिवसेना नेता संजय राऊन यांनी हा शब्द का वापरला याचं उत्तर द्यावं लागेल. कोर्टाची सुनावणी सुनावणी उद्या दुपारी पुन्हा सुरू होणार आहे.

BMC ने सांगितले हे अवैध्य बांधकाम

कोर्टात पालिकेच्या वकिलांनी सांगितले की, ही याचिका वेगळ्या प्रकारे दाखविण्यात आली आहे. मात्र सत्य परिस्थिती थोडी वेगळी आहे. हे एक असं प्रकरण आहे की जेथे याचिकाकर्त्याने बेकायदेशीर रुपात अवैध्य बांधकाम करण्यात आलं आहे. कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं की, त्यांनी कंगनाचे 30 ऑगस्टपासून ते आतापर्यंतचे सर्व ट्विट सादर केले आहेत. त्यांनी असंही सांगितलं की ते संजय राऊत यांची संपूर्ण मुलाखत शोधू शकले नाहीत. केवळ एक क्लिप आहे जी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी कोर्टाने कंगना रणौतच्या वकिलाला बीएमसीच्या कारवाईसंबंधित फाइल आणि संजय राऊत यांच्या दोन्ही मुलाखतीचे क्लिप आणण्यास सांगितले होते. यापूर्वी कंगनाच्या कार्यालयात कारवाईबाबत पालिकेच्या वकिलांनी सांगितलं की, कंगना म्हणते की हे सर्व त्यांच्या 5 सप्टेंबर रोजी केलेल्या ट्विटमुळे झालं आहे , तर ते ट्विट काय होतं, कोर्टाच्या समोर ते सादर केलं जावं ज्यामुळे वेळ लक्षात येईल.

कोर्टात राऊतांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप ऐकवली

कंगनाच्या वकिलांनी यावर म्हटलं की, कंगनाने सरकारच्या विरोधात काही वक्तव्य केलं होते आणि त्यांच्या एका ट्विटवर संजय राऊत यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. राऊत म्हणाले होते की, कंगनाला धडा शिकवावा लागेल. सोबतच कोर्टात कंगनाचे वकिल बिरेंद्र सराफ म्हणाले की, संजय राऊत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडीओ क्लिप ऐकवला, ज्यात त्यांनी हरामखोर शब्दाचा उल्लेख केला होता.

कोर्टाने विचारलं की, राऊत यांचं वक्तव्य रेकॉर्ड करू शकता?

यावर संजय राऊत यांच्या वकिलांनी सांगितलं की, माझे अशीलांनी कोणाचं नाव घेतलं नाही. कोर्टाने राऊत यांचे वकील प्रदीप थोराट यांना विचारलं की, जर संजय राऊत म्हणतात की त्यांनी कंगनासाठी या शब्दाचा वापर केला नाही, तर आपण हा जबाब रेकॉर्ड करू शकतो? यावर उद्या एफिडेव्हिट फाइल करणार असल्याचं राऊत यांच्या वकिलाने सांगितलं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 28, 2020, 7:27 PM IST

ताज्या बातम्या