श्रद्धा, दीपिका, साराच्या अडचणीत वाढ; मोबाइलसह 'या' गोष्टीतून सत्य उलगडणार, NCBच्या तपासाला वेग

या एका तपासातून मोठा खुलासा होऊ शकतो.

या एका तपासातून मोठा खुलासा होऊ शकतो.

  • Share this:
    मुंबई, 28 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत सुसाइड केसशी जोडलेल्या (Sushant Singh Rajput Suicide Case) ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) चा तपास जलद गतीने होत आहे. या प्रकरणात बॉलिवूडचे अनेक स्टार्ट अडकत असल्याचे दिसत आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे  महानिर्देशकांनी मुंबईच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीनंतर एनसीबीने या केसच्या तपासात काही प्राथमिकता ठरवल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे एनसीबी दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंहच्या बँक अकाऊंटमधून केलेल्या ट्रान्जॅक्शनचा तपास करतील. पहिली प्राथमिकता आतापर्यंतच्या सर्व लोकांचा जबाब रिव्ह्यू करणं होतं. यासोबतचं सर्व पॅडलर्सचा जबाबही रिव्ह्यू करण्यात येईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब रिव्ह्यू केल्यानंतर येणाऱ्या निकालानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल. यामध्ये कॉल डिटेल्स, एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅट यासर्वांचा तपास केला जाईल. 2017 ते 2020 पर्यंत डंप डाटा तपासण्यात येईल. हे सर्व इतकं सोपं नाही. यामध्ये अधिक काळ लागू शकतो. सोबतचं यादरम्यान जर काही सुगावा लागला तर कारवाई करण्यात येईल. हे ही वाचा-करण जोहरचं नाव घेतलं तरच...' ड्रग्ज प्रकरणात क्षितीज प्रसादचा NCB वर आरोप दरम्यान  अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) करीत असलेला तपासात अनेक सेलिब्रिटीज अडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह यांच्या तपासानंतर त्यांचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून यातून मोठा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर अनेक कलाकारांविरोधात एनसीबी लवकरच चार्जशीट दाखल करणार आहे. मोठमोठे बॉलिवूड सेलिब्रिटी एनसीबीच्या रडारवर आहेत. त्यापैकी काही जणांची आता चौकशी सुरू आहे. शिवाय आणखी अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: