मुंबई, 28 ऑक्टोबर : अभिनेते माधव अभ्यंकर यांनी झी मराठीच्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अण्णा नाईक ही भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. अण्णा नाईक द्वारे माधव अभ्यंकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत.आता अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर झी मराठीच्या मालिकेत एंट्री घेणार आहेत. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येत असणाऱ्या नव्या ट्विस्टमुळे मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर आली आहे. यश आणि परीसाठी नेहाने या जगाचा निरोप घेतला आहे. पण नेहा आता नव्या रूपात मालिकेत परतली आहे. त्यामुळे सध्या मालिकेला रंजक वळण लागलं आहे. मालिकेत नेहा आता अनुष्का या व्यक्तिरेखेत परतली आहे. त्यासोबतच मालिकेत आता अजून एका महत्वाच्या पात्राची एंट्री होणार आहे. मालिकेत अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर एंट्री घेणार आहेत. लोकसत्ता’ने याबाबत वृत्त दिलं आहे. या माहितीनुसार अनुष्का म्हणजेच नेहासोबत या पात्रासह जयंतीलाल मेहता या नव्या पात्राची एन्ट्री मालिकेमध्ये होणार आहे. हा जयंतीलाल मेहता कोण आणि त्याचा अनुष्काशी कसले संबंध आहेत हे रहस्य पुढच्या भागांमध्ये उलगडणार आहे. अभिनेते माधव अभ्यंकर या मालिकेमध्ये जयंतीलालच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. हेही वाचा - Amruta Subhash: ‘बच्चा होने वाला हैं ना?’; प्रेग्नंसी किटच्या ‘त्या’ बातमीनंतर अमृताचा आला खुलासा अभिनेते माधव अभ्यंकर अण्णा नाईक द्वारे माधव अभ्यंकर महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत. आता जयंतीलाल मेहता ही भूमिका नेमकी कशी असणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अनुष्कानंतर जयंतीलाल मेहताच्या येण्याने मालिकेमध्ये नवीन काय घडणार आहे याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश आणि नेहा यांच्यातील मोठा गैरसमज दूर झाल्याने आता त्यांचा संसार रूळावर आला होता. विश्वजित आणि मिथीला यांच्याही आयुष्यात आनंदाचे क्षण येणार होते. सिम्मीला सुद्धा तिच्या चुकांची जाणीव झाली होती तर सत्यजितने नवा बिझनेस सुरू केला होता. थोडक्यात काय तर मालिकेतील चौधरी कुटुंबाची घडी मार्गावर आली होती. पण आता सगळं सुरळीत सुरु असताना मालिकेत मोठा ट्विस्ट आला. आणि मालिकेचं कथानक संपूर्णपणे बदललं.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील यश आणि नेहा यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली. गेल्या महिन्यात ही मालिका निरोप घेणार असं जाहीर करण्यात आलं. प्रत्येक कलाकारांनी शेवटच्या सीनचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. पण या मालिकेच्या लोकप्रियतेने पुन्हा एकदा कलाकार आणि प्रेक्षकांना जवळ आणले. ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला होता. पण आता ,मालिकेला पुन्हा चांगला टीआरपी मिळू लागला आहे. मालिकेत आलेल्या नव्या ट्विस्टमुळे कथानक पुन्हा रंजक बनलं आहे. आता नेहाचं हे बदलेलं रूप नेमकं काय प्रकरण आहे, नेहा आणि यश समोरासमोर कधी येणार तसंच अण्णा नाईक यांची भूमिका नेमकी काय असणार हे प्रेक्षकांना आगामी भागात समजेल.