मुंबई, 14 ऑक्टोबर : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येत असणाऱ्या नव्या ट्विस्टमुळे मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर आली आहे. यश आणि नेहा यांच्यातील मोठा गैरसमज दूर झाल्याने आता त्यांचा संसार रूळावर आला आहे. विश्वजित आणि मिथीला यांनाही लवकरच बाळ होणार आहे. सिम्मीला तिच्या चुकांची जाणीव झालीय तर सत्यजितने नवा बिझनेस सुरू केलाय. थोडक्यात काय तर मालिकेतील चौधरी कुटुंबाची घडी मार्गावर आली आहे. पण आता सगळं सुरळीत सुरु असताना मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. झी मराठीने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या प्रोमोनुसार मालिकेला आता नवीन वळण येणार आहे. चौधरींच्या घरावर मोठं संकट ओढवणार आहे. प्रोमोनुसार मिथिला खूप आनंदात असते कारण आजोबांना तिला गोड बातमी द्यायची असते. पण तेवढ्यात टेबलाशी धडकून ती खाली पडते. यश आणि नेहा बाहेरगावी गेलेले असतात. यश गाडी चालवत असतो तेव्हा त्याला सिम्मी मिथिलाचं बाळ गेल्याचं सांगते. यशला ते ऐकून खूप मोठा धक्का बसतो. हेही वाचा - Sukh mhnaje nakki kay asta : मालिकेत येणार नवा ट्विस्ट; जीवलग भावांमध्ये पडणार फूट प्रोमोमध्ये पुढे मिथिलाबद्दल ऐकून यशचा गाडीवरचा ताबा सुटतो आणि त्याची मोठ्या गाडीशी धडक होते. यश आणि नेहाचा मोठा ऍक्सिडेंट होतो. त्यांचा जीव धोक्यात आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेत आलेलं हे नवं संकट यश आणि नेहाच्या जीवावर बेतणार आहे. आता मालिकेत काय घडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील यश आणि नेहा यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडली. गेल्या महिन्यात ही मालिका निरोप घेणार असं जाहीर करण्यात आलं. प्रत्येक कलाकारांनी शेवटच्या सीनचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. पण या मालिकेच्या लोकप्रियतेने पुन्हा एकदा कलाकार आणि प्रेक्षकांना जवळ आणले. ही मालिका पुन्हा सुरू करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला होता.
नेहाचा पहिला नवरा अविनाश हा यश आणि नेहाच्या वैवाहिक आयुष्यात आल्यानंतर जो काही त्रास होतो त्या नोटवर या मालिकेने वळण घेतलं होतं. यामध्ये परीचीही होरपळ झाली. अविनाशचा खोटेपणा उघड झाल्यानंतर तो चौधरींच्या आयुष्यातून निघून गेला. नेहा पुन्हा पॅलेसमध्ये आली. यानंतर नेहा आणि यश यांच्यातील रोमान्स पहायला प्रेक्षकांना पाहायला मिळणार होता. मात्र चौधरी कुटुंबावर आलेल्या या संकटामुळे आता मालिका नवीन वळण घेणार आहे.