मुंबई, 28 ऑक्टोबर : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष आज सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. अमृतानं शेअर केलेल्या प्रेग्नंसी टेस्टच्या रिपोर्ट्सनंतर अमृता प्रेग्नंट असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला. सोशल मीडियावर अमृताला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. वयाच्या 43व्या वर्षी अमृता आणि तिचा नवरा संदेश कुलकर्णीनं घेतलेल्या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं. मात्र अमृता खरंच प्रेग्नंट आहे का यावर तिनं काही स्पष्टपणे सांगितलं नव्हतं. मात्र चाहत्यांची उत्सुकता जास्त न ताणता अखेर अमृतानं तिची खरी गुड न्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. प्रेग्नंसी किटच्या फोटोनंतर अमृतानं थेट व्हिडीओ शेअर केलाय. अभिनेत्री अमृता सुभाष आणि तिचा नवरा अभिनेता दिग्दर्शक संदेश कुलकर्णी सध्या ‘पुनश्च हनिमून’ या धम्माल नाटकात एकत्र काम करत आहेत. संदेशनं स्वत: हे नाटक लिहिलं असून दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. सध्या नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग सुरू असून दोघेही सातत्यानं एकमेकांबरोबर असतात. अशातच संदेश आणि अमृता पुन्हा एकदा एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि याच नव्या कलाकृतीचं प्रमोशन करण्यासाठी दोघांनी प्रेग्नंसी किटचा घाट घातला होता. हेही वाचा - Amruta Subhash: वयाच्या 43व्या वर्षी अभिनेत्री अमृता सुभाषनं घेतला मोठा निर्णय, घरात पाळणा हलणार? अभिनेत्री अमृता सुभाष प्रेग्नंट नसून नव्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी केलेली ही युक्ती होती. ‘वंडर वुमन’ या आगामी प्रोजेक्टमध्ये अमृता दिसणार आहे. त्यामुळे अमृता प्रेग्नंट नसू वंडर वुमनमधील जया प्रेग्नंट आहे. अमृतानं व्हिडीओ शेअर करत जया या पात्राची पहिली झलक देखील प्रेक्षकांसमोर आणली आहे. त्यामुळे आता अमृता प्रेग्नंट नाही यावर शिक्का मोर्तब झाला आहे.
अमृतानं म्हटलंय, ‘तर, ती मी नाही वंडर वुमनमधील जया प्रेग्नंट आहे. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर जे प्रेम केलं ज्या शुभेच्छांचा वर्षाव केला तसाच जयावरही करा’. वंडर वुमनाबाबत आणखी एक खास गोष्ट यावेळी अमृतानं सांगितली आहे. ती म्हणजे वंडर वुमेनमध्ये संदेश कुलकर्णी तिच्या नवऱ्याची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे हे कपल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वंडर वुमन सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे.
अमृतानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिनं वंडर वुमनमधील जया साकारली आहे. जया ही गावाकडची महिला आहे. व्हिडीओमध्ये जया ऑनलाइन माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधत आहे. नवऱ्याच्या मदतीनं ती डॉक्टरांशी प्रेग्नंसी विषयावर संवाद साधताना दिसतेय. ‘बच्चा होने वाला हैं ना?’, असा प्रश्न ती डॉक्टरांना विचारताना दिसतेय. अमृताची ही नवी कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. तसंच तिच्या नवा गुड न्यूजबाबत शुभेच्छा देखील दिल्यात.