जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'मस्तराम सीझन 2'ची तयारी सुरू, पण अभिनेत्याला इंटिमेट सीन्सच्या शूटिंगची चिंता

'मस्तराम सीझन 2'ची तयारी सुरू, पण अभिनेत्याला इंटिमेट सीन्सच्या शूटिंगची चिंता

'मस्तराम सीझन 2'ची तयारी सुरू, पण अभिनेत्याला इंटिमेट सीन्सच्या शूटिंगची चिंता

‘मस्तराम’ या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला मिळालेलं घवघवीत यश पाहता निर्मात्यांनी आता याच्या दुसऱ्या सीझनची तयारी सुरू केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 23 मे : सध्या कोरोना व्हायरसने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावरही झाला आहे. अनेक सिनेमांचं प्रदर्शन रखडलं आहे. अशात वेब सीरिज हा प्रेक्षकांसाठी उत्तम पर्याय ठरत आहे. सध्या सिनेमांपेक्षा वेब सीरिजची जास्त चलती आहे. अनेक वेब सीरिजमध्ये वेगळे आणि नवे विषय हाताळले गेले आणि या वेब सीरिजना प्रचंड यशही मिळालं. अशीच एक वेब सीरिज ‘मस्तराम’. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला मिळालेलं घवघवीत यश पाहता निर्मात्यांनी आता याच्या दुसऱ्या सीझनची तयारी सुरू केली आहे. ‘मस्तराम’मध्ये अभिनेता अंशुमन झा मुख्य भूमिकेत आहे. या वेब सीरिजचा पहिला सीझन त्यातील इंटिमेट सीन्समुळे खूप चर्चेत राहिला. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला मिळालेली लोकप्रियता लक्षात घेता आता या वेब सीरिजच्या लेखकाने दुसऱ्या सीझनच्या कथेच्या लेखनाला सुरूवात केली आहे. मात्र कोरोना व्हायरसमुळे पहिल्या सीझनमध्ये जेवढे इंटिमेट सीन्स होते. तेवढे सीन दुसऱ्या सीझनमध्ये असणार नाहीत. पहिला सीझन जिथे संपला तिथून पुढची कथा सुरू होईल. या वेब सीरिजमध्ये अंशुमन झा ने राजारामची भूमिका साकारली होती. मनोरंजन उद्योग तात्पुरता ग्रीन झोनमध्ये हलवता येईल का? मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा

जाहिरात

या वेब सीरिजचे लेखक मस्तराम सीझन 2ची सुरुवात पहिला सीझन ज्या ठिकाणी संपला तिथून होईल आणि या सीझनमध्ये पूर्णपणे रामराजच्या पात्रावर लक्ष केंद्रीत करण्याचा आमचा विचार आहे. तीन महिन्यांनंतर या विषाणूची स्थिती काय असेल माहित नाही पण तीन महिन्यांनंतर आम्ही या सीझनचं शूटिंग सुरू करण्याचा विचार करत आहोत. सध्या मी स्टोरी लिहिताना इंटिमेट सीन्स वगळले आहेत. कोरोना विषाणूची त्यावेळी काय परिस्थिती आहे. हे लक्षात घेऊन तीन महिन्यांनंतर आम्ही इंटिमेट सीन्सचं लिखाण करू. भविष्यात जशी परिस्थिती असेल त्याला अनुसरूनच इंटिमेट सीन्स असतील.

या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असणारा अभिनेता अंशुमन झा सांगतो, ‘मस्तराम’ला मिळालेल्या यशानंतर आम्ही याच्या सीझन 2 चा विचार केला. ज्यात राजारामच्या लव्ह लाइफवर लक्ष केंद्रित केलं जाईल या वेब सीरिजमध्ये मी राजारामची भूमिका साकारली आहे. जो एरोटिक पुस्तकं लिहतो आणि ती वाचकांमध्ये खूप लोकप्रिय सुद्धा होतात. पण आता मात्र या सीझनमध्ये इंटिमेट सीन्स शूट करताना मला खूप सावधानता बाळगावी लागेल. सेटपासून ते घरापर्यंत योग्य प्रोटोकॉलचे अनुसरण करेन, कारण यावेळी सुरक्षेला सर्वात जास्त प्राधान्य आहे.’ पाकिस्तानच्या विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलने गमावला जीव बॉलिवूडची मस्तानी होती या अभिनेत्याची दिवानी, झोपण्याआधी पोस्टरला करायची KISS

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात