मुंबईतला मनोरंजन उद्योग तात्पुरता ग्रीन झोनमध्ये हलवता येईल का? मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत उद्योग सावरण्यावर झाली चर्चा

मुंबईतला मनोरंजन उद्योग तात्पुरता ग्रीन झोनमध्ये हलवता येईल का? मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेत उद्योग सावरण्यावर झाली चर्चा

महाराष्ट्रातल्या मनोरंजन उद्योगातल्या प्रमुख उद्योजकांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत ऑनलाईन मीटिंग झाली. या VIDEO Conferencing मध्ये सध्या Coronavirus मुळे बंद पडलेल्या मनोरंजन उद्योगाला पुनरुज्जीवन कसं देता येईल याविषयी चर्चा झाली.

  • Share this:

मुंबई, 22 मे : महाराष्ट्रातल्या मनोरंजन उद्योगातल्या प्रमुख उद्योजकांची आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत ऑनलाईन मीटिंग झाली. या VIDEO Conferencing मध्ये सध्या Coronavirus मुळे बंद पडलेल्या मनोरंजन उद्योगाला पुनरुज्जीवन कसं देता येईल याविषयी चर्चा झाली. Viocom18 चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO राहुल जोशी यामध्ये सहभागी झाले होते.

मनोरंजन उद्योग ही मुंबईची लाइफलाइन आहे. या उद्योगाने मुंबईला वेगळी ओळख दिलेली आहे. पण मुंबईवर सध्या COVID-19 चं मोठं संकट असल्याने हा उद्योगसुद्धा अडचणीत सापडला आहे. नव्या मालिका, चित्रपट यांचं चित्रिकरण लॉकडाऊनमुळे ठप्प आहे. हातावर पोट असलेल्या या उद्योगावर अवलंबून असलेल्या लोकांचे हाल होत आहेत. हा उद्योग सावरायला काय करता येईल याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा झाली.

झी, बालाजी, Viocom18, सोनी अशा अनेक उद्योगांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते. मुंबईत फिल्म सिटीसारख्या ठराविक ठिकाणी चित्रिकरण सुरू करण्यास परवानगी देता येईल का याविषयी चर्चा झाली. तसंच मुंबईबाहेर ग्रीन झोनमधल्या शहरांचा विचार मनोरंजन उद्योग करेल का, अशी सूचनासुद्धा मांडण्यात आली. मुंबईतून मनोरंजन उद्योग हलवण्याचं उद्दिष्ट नाही, पण काही प्रमाणात या उद्योगाचं स्थलांतर कोल्हापूरसारख्या ग्रीन झोन क्षेत्रात होऊ शकतं का, असा मुद्दा चर्चेत आला. पण मनोरंजन क्षेत्राचे संबंधित कुठे राहतील वगैरे मुद्द्यांवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतिक सचिव डॉ.संजय मुखर्जी यांनी सर्वांची मतं जाणून घेतली. आता यावर शासनाकडून पुढच्या दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे.

VIACOM18 च्या राहुल जोशी यांच्यासह झी समूहाचे पुनित गोएंका, सोनीचे एन.पी. सिंग, स्टारचे माधवन, झीच्या डोमेस्टिक ब्रॉडकास्टिंग बिझनेसचे पुनील मिश्रा, बालाजी टेलिफिल्मच्या एकता कपूर, एंडेमॉलचे अभिषेक रेगे, बनिंजय एशियाचे दीपक धर, इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर कौन्सिलचे जे. डी. मजिठिया, नितीन वैद्य, अभिनेते निर्माते आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.

हे वाचा लॉकडाऊनमध्ये 'या' क्षेत्राचे सर्वात जास्त नुकसान, सरकारने दिली माहिती

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असले तरी चिंतेचे कारण नाही. शासन पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. वेळेवर लॉकडाऊन केल्यामुळे व पुरेशी काळजी घेतल्याने आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या अंदाज  करण्यात आला होता त्या तुलनेत खूप वाढलेली नाही. दूरचित्रवाणी वाहिन्या आणि त्यावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्री घराघरात पोहचली आहे. या लॉकडाऊनमुळे त्यांना फटका बसला आहे  परंतु सर्व काही थांबून राहावे या मताचा मी नाही. आपण यापूर्वीच रेड झोन वगळून इतरत्र मर्यादित प्रमाणात का होईना व्यवहार सुरु केले आहे. आता आपण झोनपेक्षा कंटेनमेंट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांचीही व्याप्ती कमी केली आहे. आपण कालच मराठी निर्माते, कलाकार यांच्यासमवेत विस्तृत चर्चा केली असून त्यांच्याही मागणीप्रमाणे पोस्ट प्रॉडक्शनची कामे किंवा शहरांबाहेर मर्यादित प्रमाणात चित्रीकरण करता येईल का याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.इंडियन ब्रॉडकास्टर्स  फाऊंडेशनने सध्याच्या परिस्थितीत चित्रिकरणाबाबत आपण सावधानता बाळगून काय करू शकतो याचा आराखडा द्यावा, तो सांस्कृतिक कार्य विभागाकडून तपासून त्यावर निर्णय घेण्यात येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

टीव्ही उद्योग हा मनोरंजन क्षेत्राचा फार मोठा भाग असून अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. हा उद्योग इथे स्थिरावला आहे आणि तो राज्यातच अधिक मजबूत व्हावा म्हणून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शुक्रवारी सोन्याच्या किंमती वाढल्या तर चांदी उतरली, पाहा आजचे दर

First published: May 22, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading