दीपिका पदुकोण नेहमीच तिच्या बहिणीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. एका मुलखातीत तिनं सांगितलं होतं की तिची बहीण तिची सर्वात मोठी समीक्षण आहे. दीपिका म्हणाली, मी कधीच माझ्या बहीणीच्या बोलण्याचं वाईट वाटून घेत नाही. करण मला माहित आहे की ती खूप प्रामाणिक आहे. तिला नेहमी वाटतं की माझ्या आयुष्यात मी सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे कराव्या.
दीपिका पदुकोण शेवटची छपाक सिनेमात दिसली होती. ज्यात तिनं एका अॅसिड हल्ला झालेल्या मुलीची भूमिका साकारली होती. हा सिनेमा फारसा चालला नसला तरीही या सिनेमातील तिच्या भूमिकेच कौतुक मात्र खूप झालं. लवकरच दीपिका रणवीर सिंहसोबत 83 या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती कपिल देव यांच्या पत्नीची म्हणजेच रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची भूमिका साकारत आहे. लग्नानंतर रणवीर दीपिकाचा एकत्र हा पहिलाच सिनेमा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Deepika padukone