पाकिस्तानच्या विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलने गमावला जीव; काकांच्या निधनामुळे निघाली होती कराचीला
शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसलेला फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना म्हटलं होतं की, "Fly high, it’s good''
|
1/ 9
पाकिस्तानात कराची विमानतळाच्या दिशेनं निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान कोसळताच त्याला आग लागली. या विमानात जवळपास 100 प्रवासी होते अशी माहिती समोर येत आहे.
2/ 9
विमान दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला किंवा वाचले याची माहिती मिळालेली नाही. मात्र यामध्ये पाकिस्तानची प्रसिद्ध मॉडेल झारा आबिद हिचा मृत्यू झाला आहे.
3/ 9
लाहोरहून कराचीकडे जाणाऱ्या विमानाची लँडिंगच्या आधी अपघात झाला. झारा आबिदच्या काकांचे निधन झाल्यानं ती लाहोरमधून निघाली होती.
4/ 9
पाकिस्तानी मॉडेल झारा अबिद अपघातग्रस्त विमानामध्ये होती. तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
5/ 9
फॅशन डिझायनल खादिजाह शाहने ट्विटरवर म्हटलं की, फॅशन जगताने विमान अपघातात झारा आबिदला गमावलं. ती कष्टाळू आणि व्यावसायिक होती. तिच्या आत्म्याला शांती लाभो.
6/ 9
झारा आबिदने शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसलेला फोटो पोस्ट केला आहे. त्याला कॅप्शन देताना म्हटलं होतं की, "Fly high, it’s good'. तिची ही शेवटची पोस्ट ठरली.
7/ 9
झारा आबिद तिच्या पारंपरिक पोषाखातील मॉडेलिंगसाठी प्रसिद्ध होती.
8/ 9
कराची विमानतळाच्या दिशेने निघालेलं हे विमान लँड होण्यापूर्वी काही क्षण शहराच्या निवासी भागातच कोसळलं त्यामुळे हाहाकार उडाला.
9/ 9
लाहोरहून प्रवाशांना घेऊन निघालेलं पाकिस्तान एअरलाईन्सचं (PIA) विमान कराची विमानतळाच्या जवळच कोसळलं.