मुंबई, 10 मार्च: बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (farhan akhtar) आणि शिबानी दांडेकर (shibani dandekar) यांनी अलिकडेच लग्नगाठ बांधली. 19 फेब्रुवारी रोजी या दोघांनी लग्न केलं असून अद्यापही सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. दरम्यान, फरहानसोबत शिबानीने का लग्नगाठ बांधली याचा खुलासा केला आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर विवाह बंधनात अडकले आहेत. दोघांनी फरहान अख्तरच्या खंडाळा येथील फार्महाऊसमध्ये विवाह केला. शिबानी आणि फरहान हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सध्या शिबानी लग्नाचे काही फोटो शेअर करत सर्वाकडून कौतुकाचा वर्षाव करुन घेत आहे.
दरम्यान, शिबानी-फरहानच्या लग्नात फराह खाननेही हजेरी लावली होती. शिबानीसोबतचे एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत फराह खानने खास कॅप्शन दिली आहे. ‘भाभी शिबानी दांडेकर #womeninlove’ असे फराहने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. फराहच्या या पोस्टनंतर शिबानीने खास रिप्लाय दिला.
लव्ह यु सो मच असे प्रेम व्यक्त करत तुझी वहिनी बनण्यासाठी मी फरहासोबत लग्न केले असल्याचे म्हटले आहे. लग्नात शिबानीने बॉडी फिट असलेला ड्रेस निवडला होता. 2016 पासून फरहान आणि शिबानी एकमेकांना डेट करत होते. अखेर कुटुंबाच्या संमतीने या दोघांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. हे लग्न विविध कारणांमुळे चर्चेत राहिलं. फरहानच्या मुली या लग्नात उपस्थित होत्या म्हणून एकीकडे चर्चा रंगली. तर, फरहानची पहिली पत्नी अधुना या लग्नामुळे ट्रोल झाली. त्यामुळे हे लग्न अनेक कारणांसाठी चर्चेत राहिलं.