मुंबई, 10 मार्च- ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या शोमध्ये अनेक कलाकार प्रमोशनसाठी हजेरी लावत असतात. या दरम्यान त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायला मिळतात. नुकतंच अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आपल्या पतीच्या आगामी बहुचर्चित ’ द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाच्या निमित्ताने या शोमध्ये आली होती. दरम्यान अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) आणि लोकप्रिय गायक स्वप्नील बांदोडकरसुद्धा (Swapnil Bandodkar) उपस्थित होता. यावेळी एक अशी गोष्ट समोर आली जी कदाचित फारच कमी लोकांना माहिती असेल. पाहूया काय आहे ती गोष्ट. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा शो प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारा शो म्हणून ओळखला जातो. हा शो प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करतो. तसेच यानिमित्ताने शोमध्ये येणाऱ्या कलाकरांबद्दल अशा अनेक गोष्टी जाणून घ्यायला मिळतात ज्या कधीही ऐकलेल्या नसतात. नुकतंच अभिनेत्री पल्लवी जोशी, स्वप्नील बांदोडकर आणि चिन्मय मांडलेकरसारख्या कलाकारांनी शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान या कलाकारांच्या अनेक खाजगी गोष्टी नव्याने प्रेक्षकांच्या समोर आल्या आहेत.
पल्लवी जोशी स्वप्नील बांदोडकरमध्ये खास नातं- मनोरंजनसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांचे आधीपासूनच कौटुंबिक सबंध आहेत. आणि त्यांच्यामध्ये खास नातंसुद्धा आहे. असंच काहीसं आहे पल्लवी आणि स्वप्नीलचंसुद्धा. गायक स्वप्नील जोशीच्या पत्नीशी पल्लवीचा खास संबंध आहे. स्वप्नीलची पत्नी संपदा बांदोडकर ही पल्लवी जोशीची मावस बहीण आहे. या दोघींमध्ये फारच छान बॉन्डिंग आहे. अर्थातच पल्लवी स्वप्नीलची मेहुणी लागते. या दोघांमध्येसुद्धा उत्तम बॉन्डिंग असल्याचं सेटवर पाहायला मिळालं. (हे वाचा: या मराठी अभिनेत्रीनं लंडनमध्ये घेतली मास्टर्सची पदवी, आई आहे उच्चशिक्षित ) अभिनेत्री पल्लवी जोशी अगदी बालपणापासून मनोरंजनसृष्टीत काम करत आहे. तिच्या कुटुंबाकडूनच तिला कलेचा वारसा मिळाला आहे. कारण तिचं कुटुंब या क्षेत्राशी निगडित आहे. अभिनेत्रीचा भाऊ मास्टर अलंकार याने बालकलाकार म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मावस बहीण संपदा संगीताचं प्रशिक्षण देते. पल्लवी जोशीचे पती विवेक अग्निहोत्री एक दिग्दर्शक आहेत. सध्या त्यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट फारच चर्चेत आहे.