जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता दिलीप कुमार यांना Coronavirus ची लागण? आयसोलशनमध्ये ठेवल्याचा ट्विटरवरून खुलासा

अभिनेता दिलीप कुमार यांना Coronavirus ची लागण? आयसोलशनमध्ये ठेवल्याचा ट्विटरवरून खुलासा

अभिनेता दिलीप कुमार यांना Coronavirus ची लागण? आयसोलशनमध्ये ठेवल्याचा ट्विटरवरून खुलासा

अभिनेता दिलीप कुमार मागच्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. सध्या त्यांचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 मार्च : सध्या जगभरात CoronaVirusनं अक्षरशः थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे जगात आतापर्यंत हजारोंच्या संख्येनं बळी गेले आहे. यातून सेलिब्रेटी सुद्धा सुटलेले नाहीत. महाराष्ट्रातील या व्हायरसच्या रुग्णांची संख्या 39 वर पोहोचली असून नुकताच मुंबईतील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सरकार कडून याबबात टप्प्याटप्प्यानं पावलं उचलली जात असतानाचं सर्वजण या व्हायरसपासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचं आव्हान करत आहेत. अशा दिलीप कुमार यांचं ट्वीट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. अभिनेता दिलीप कुमार मागच्या काही दिवसांपासून लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. अशाच कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता त्यांच्या तब्येत ठिक राहावी यासाठी आधीपासूनच काळजी घेतली जात असून त्यांना आयसोलशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांनी याची माहिती त्यांच्या ट्विटरवरुन दिली. Coronairus चं देशात थैमान, अमृता सुभाषनं शेअर केलेलं हे गाणं देईल नवी उमेद दिलीप कुमार यांनी त्यांच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलं, ‘कोरोना व्हायरस सगळीकडे पसरत असल्यानं मला अगोदरच आयसोलशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. मला कोणत्याही प्रकारचं इफेक्शन होऊ नये याची सायरा आधीच काळजी घेत आहे तिला याबाबत कोणतीही रिस्क घ्यायची नाही.’ यासोबतच त्यांनी आपली प्रकृती ठीक असल्याचंही सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांची पाठीच्या दुखण्यामुळे तब्येत अचानक बिघडल्यानं लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. जान्हवी कपूरनं शेअर केला बेडरुम VIDEO, दोस्ताना 2 च्या टीमची झाली पोलखोल

जाहिरात

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूची दहशत जगभरात पसरली आहे. भारतासह जगातील अन्य देशांमध्ये सतत नवीन प्रकरणे नोंदवली जात आहेत. चीनमध्ये या विषाणूमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर इटली आणि इराणमध्येही दिवसेंदिवस परिस्थिती वाईट होत आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूमुळे चीन आणि इटलीमधील परिस्थिती सहाव्या टप्प्यात पोहोचली आहे. तर भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. टॉम हँक्सनंतर आता गेम ऑफ थ्रोन्सचा अभिनेता Coronavirus पॉझिटिव्ह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात