कोरोनापेक्षा TRP वर प्रेम, 'तारक मेहता'च्या निर्मात्याने केली अजब मागणी

कोरोनापेक्षा TRP वर प्रेम, 'तारक मेहता'च्या निर्मात्याने केली अजब मागणी

'तारक मेहता'च्या निर्मात्याने केलेल्या या ट्विटवर चाहत्याने कानउघडणी केली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 17 मार्च : कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता ही जगभरातील नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे चित्रपट व मालिकांचं शूटिंग बंद करण्यात आलं आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे. मात्र 'तारक मेहता का उलटा चष्मा' (tarak mehta ka ooltah chashmah) या मालिकेच्या निर्मात्यांनी अजबच मागणी केली आहे.

'तारक मेहता का उलटा चष्मा' ही मालिका बर्‍याच काळापासून लोकांचं मनोरंजन करीत आहेत. या मालिकेच हास्यासह सामाजिक भानही जपणुकीचा संदेश दिला जातो. सध्या सिने व मालिका क्षेत्रात कोरोना व्हायरसमुळे शूटिंगमध्ये व्यत्यय आला आहे. सरकारने बर्‍याच ठिकाणी जाण्यास, गर्दी करण्यास बंदी घातली आहे. परिणामी चित्रपटाचे शूटिंगही बंद करण्यात आले आहे. सध्या देशात पसरणाऱ्या कोरोना (Covid - 19) व्हायरसच्या भीतीने टीव्ही कार्यक्रमांचे शूटिंग थांबवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

संबंधित - कोरोनामुळे बंद करणार मुंबईची लोकल? 3:30 वाजता होणार निर्णय

असित मोदी यांनी केलं ट्विट

सरकारने शूटिंग थांबविण्याचे आदेश दिले असले तरी असे दिसते की 'तारक मेहता'चे निर्माते थांबण्याच्या मन: स्थितीत नाहीत. शोचे निर्माते असित मोदी यांनी ट्विट करुन सरकारला यासंदर्भात विनंती केली आहे.

संबंधित - लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय? मुंबई-पुण्यात काय होणार?

असित मोदी यांनी ट्वीट करून लिहिले आहे की, सर आम्हाला या परिपत्रकाविषयी काही स्पष्टता मिळत नाही. सध्या फिल्म सिटी आम्हाला शूटिंग करण्यास परवानगी देत ​​नाही. आम्ही सेटवर आणि छोट्या छोट्या युनिटसह सर्व मार्गदर्शक सूचना पाळत आहोत. सर, कृपया उद्यापर्यंत परवानगी द्या.

या व्यतिरिक्त त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून त्यामध्ये लिहिलं आहे की, सर कृपया आपल्या परिपत्रकाविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. फिल्मसिटीत सर्व चित्रपटांचं शूटिंग थांबले आहेत का? एमआयडीसी, कारखाने, सरकारी कार्यालये, खासगी कार्यालये आजपासून बंद आहेत का? आम्ही सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन  करीत आहोत. आम्ही कमी युनिट्ससह काम करू शकतो का?

मात्र या ट्विटनंतर अनेक चाहत्यांनी निराजी दर्शवली आहे. कोरोना व्हायरस हा जागतिक धोका आहे. एका चाहत्याने लिहिले की, सर कृपया आधी तुमच्या लोकांची काळजी घ्या. शूटिंग होतंच राहिल. कलाकारांना दूरवरुन यावं लागत असल्याने शक्य असल्यास प्रत्येकाला सुट्टी द्या.

संबंधित - पुण्यातील पब आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा 31 मार्चपर्यंत राहणार बंद!

First published: March 17, 2020, 2:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading