• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • पुन्हा दिसणार अण्णाची दहशत; 'रात्रीस खेळ चाले 3' चे नवे एपिसोड लवकरच

पुन्हा दिसणार अण्णाची दहशत; 'रात्रीस खेळ चाले 3' चे नवे एपिसोड लवकरच

लॉकडाऊनमुळे मालिकेचं शुटींग बंद करावं लागलं होतं

 • Share this:
  मुंबई, 29 जून- ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale 3) या मराठी मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा चाहत्यांची लाडकी बनली आहे. या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या प्रचंड यशानंतर मालिकेचा तिसरा भागसुद्धा काही महिन्यांपूर्वीच आपल्या भेटीला आला होता. अनेक राह्स्यांचा उलघडा होतं असतानाचं, लॉकडाऊनमुळे मालिकेचं शुटींग बंद करावं लागलं होतं. त्यामुळे चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. मात्र आत्ता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मालिकेचं शुटींग सुरु होणार असून, नवीन भाग चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.
  झी मराठीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही रहस्यमयी मालिका तुफान लोकप्रिय झाली होती. मालिकेतील अण्णा, शेवंता, माई, पासून सुसल्या आणि पांडूपर्यंत सर्वच कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. मालिकेला मिळालेलं प्रचंड यश आणि चाहत्यांकडून होतं असलेली मागणी यामुळे मालिकेचे 3 भाग आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. काही राह्स्यांचा उलघडा होतं असतानाचं मालिकेचं शुटींग बंद करावं लागलं होतं. लॉकडाऊनमुळे शुटींगवर निर्बंध आले होते. मात्र चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. लवकरच मालिकेचं शुटींग सुरु होणार आहे. आणि त्यामुळेच मालिकेचे नवे एपिसोड आपल्या भेटीला येणार आहेत. (हे वाचा: VIDEO: मराठी अभिनेत्रीचा साउथ इंडियन तडका; प्रियाने बनवला चटपटीत डोसा  ) ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असणारा प्रल्हाद कुरतडकरनं याबद्दलची माहिती दिलि आहे. प्रल्हादनं म्हटलं आहे. या मालिकेच्या तिसऱ्या भागात अनेक नवे बदल आहेत. मालिकेत काही वर्षाचं अंतर दाखवण्यात आल्याने अनेक बदलसुद्धा दिसून येत आहेत. या भागात अनेक रहस्यसुद्धा आहेत. त्यांचा उलघडा हळूहळू होतं आहे. मालिकेत सध्या अण्णा आणि शेवंता भूत म्हणून वावरत आहेत. त्यामुळे अजूनही नवे ट्वीस्ट पाहायला मिळणार आहेत.  त्यामुळेच लवकरात लवकर मालिकेचं शुटींग सुरु करण्यात येणार आहे. सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळेच कोकणात प्रचंड पाऊस सुरु आहे. तरीसुद्धा आम्ही या मालिकेचं शुटींग सुरु करणार असल्याचं प्रल्हादने म्हटलं आहे. त्यामुळे चाहते जाम खुश झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: